मुक्तपीठ टीम
समाजात अबला म्हणून संबोधलं जाणाऱ्या महिलांची स्त्रीशक्ती संधी मिळाली तर उत्तुंग झेप घेते. त्यांच्या मनात अनेक चांगल्या कल्पना असतात आणि प्रत्यक्षात आणण्याची धमकही असते. जिजाऊच्या वसईमधील दिपाली शिंदे आणि टीमचं आदर्श गावाचं सादरीकरण तेच दाखवून देते.
नमस्कार…आमचं स्वप्नातलं गाव कसं असावं यासाठी आम्ही एक आराखडा काढला आहे, ज्याद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये राहतो तर आपल्याकडे डोंगररांगा आहेत, तर डोंगररांगा आम्ही तशापद्धतीने दाखवल्या आहेत. तसेच आपल्या गावामध्ये एक ग्रामपंचायत असावी, जेणेकरून आपल्या ज्या काही समस्या येतात त्या थोड्या का होईना सोडवल्या जातात, तसेच योजना राबवल्याही जातात. तसेच आमच्या गावामध्ये एक चांगली शाळा असावी, जेणेकरून मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत. तसेच गावामध्ये लहान मुलांसाठी अंगणवाडीची सोय आहे. जेणेकरून लहान मुलांना शिक्षणाची गोडी वाटेल. अंगणवाडी ही शाळेच्या बाजूला दिली आहे त्या मुलांना समजेल की, आपल्याला मोठे होऊन त्या शाळेत जायचे आहेत. तसेच आम्ही शाळेत जाणारी मुलेही दाखवली आहेत.
शेती दाखवली आहे, जेणेकरून आपले गाव समृद्ध असावे. नदीच्या बाजूला शेती आहे कारण नदीचे पाणी शेतीसाठी सहज मिळेल आणि हिरवाई बहरेल. तसेच एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी मुलं अक्षरश: दप्तर डोक्यावर घेऊन जातात. तर सर्वांच्या सोयीसाठी आम्ही पूल बांधला आहे. तसेच विहिरीसोबतच आमच्या गावी बोरवेलही आहे. महिला अक्षरश: एक, दोन मैलांवर जाऊन पाणी आणतात, त्यामुळे पाण्याची पाईपलाईनही आमच्या गावी आहे. गावात कचराकुंडी आहे, ज्यात सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा टाकला जातो. तसेच कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीही आहे. तसेच गावात प्रत्येकाच्या घरात एलपीजी गॅस आहे, महिला चुलीवर जेवण करतात. हा मला मान्य आहे चुलीवरचं जेवण हे चविष्ट लागते. पण त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. एलपीजी गॅसद्वारे जेवन चटकन, पटकन आणि फटकन होते.
गावामध्ये घरांची रचनाही चांगली असावी. प्रत्येकाच्या घरासमोर सोयीस्कर जागा असावी. यासाठी रस्ता बनवला आहे. किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन केंद्र बनवले आहे. गावात वाढदिवस, सण, लग्नसंमारंभासाठी एक समाज मंदिर बांधण्यात आले आहे. तसेच गावात महिला बचत केंद्र आहे. गावाकऱ्यांच्या रोजगारासाठी गावात कंपनी आहे. तसेच आमच्या गावात शौचालयाच्या सुविधा सुद्धा आहेत.