मुक्तपीठ टीम
गावं तसं चांगलं पण अस्वच्छतेनं गांजलं. आपल्याकडे अनेक गावांची स्थिती अशीच असते. त्यातून आरोग्य समस्याही उद्भवतात. नेमकं हेच ओळखून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये स्वच्छता मोहिमा राबवत आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका, मुरबाड तालुका, शहापूर असो की कल्याणे. तसंच पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वसई, डहाणू कोणत्याही तालुक्यातील गावांमध्ये सध्या ‘एकच नाद, जिजाऊचं नाव, स्वच्छ गाव!’ असा घोष दुमदुमतो आहे. गावातील लहान मोठे, स्त्री पुरुष, शिक्षित – अशिक्षित सारेच एकवटले आहेत. राजकारण बाजूला सारत सर्वच गावकरी सरसावलेत ते गावातील कचरा दूर सारण्यासाठी.
निमित्त आहे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या १७ एप्रिल रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांनी भरलेला महिना साजरा करण्याचं.
याविषयी मुक्तपीठशी बोलताना जिजाऊच्या महिला सक्षमीकऱण प्रमुख मोनिकाताई पानवेंनी संकल्पना मांडली, “केवळ एक दिवस वाढदिवस दणक्यात करण्यापेक्षा पूर्ण महिनाभर सेवाभावी उपक्रमांनी लोकांसाठी काम करायचं, या उद्देशानं विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. त्यातीलच एक सेवाभावी कार्यक्रम जिजाऊ स्वच्छता मोहिमेचा. या मोहिमेत गावातील सारेच झाडून उतरतात. हाती झाडू असतोच असतो. महिला कंबरेला पदर खोचत तर पुरुष पँटची घडी वर करत सरसावतात. गावागावात एकच नाद घुमतो. आणि रस्त्यावरील कचरा साफ होवू लागतो. धुरळा उडतो पण पर्वा नसते कुणाला. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर असतं आपलं गावं स्वच्छ गाव बनवायचं आणि गावात स्वच्छतेतून आरोग्याचा मार्ग चालतानाच अप्पांनाही स्वच्छ गावाचं गिफ्ट द्यायचं.”
सध्या हा उपक्रम पुढील गावांमध्ये जोमात राबवला जात आहे: