मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात अनाथ झालेल्या शेकडो लहान मुलांच्या भविष्याची नवी समस्या समोर ठाकली आहे. त्यांना दत्तक घेण्यासाठी समाजमाध्यमांवर काही संशयास्पद आवाहनंही पसरू लागली. अखेर राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागानं हस्तक्षेप करीत अशा प्रकारे थेट दत्तक घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी तातडीनं जनजागरणाची पावलं उचलली. एकीकडे पुण्याच्या कामाच्या नावाखाली होणारे असे वेगळे प्रकार आणि त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील एक संस्था मात्र सरकारी नियम अटी पाळण्याची हमी देत अनाथ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी पुढे आली आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पालघर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यांमधील कोरोना अनाथ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याची तयारी दाखवली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ही महाराष्ट्रासाठी महासंकटकारी ठरली आहे. या लाटेत शहरी आणि ग्रामीण भागातील अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यातही वाईट भाग असा की काही कुटुंबामध्ये तर आई-वडिल दोन्ही मोठी माणसं कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे घरातील लहान मुलं अनाथ झाली. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही अशी अनेक मुले अनाथ झालीत.
हेही वाचा: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना उपचारांसाठी ‘जिजाऊ’ची साथ
कोरोना संकटात अनाथ झालेल्या या मुलांविषयी निलेश सांबरे यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांचे भविष्य उज्जल घडवण्यासाठी त्यांची महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची जबाबदारी घेण्याचे ठरविले. त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी कोरोनाच्या भीषण अशा दुसऱ्या लाटेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समर्थपणे मुकाबला करीत आहे. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून ते जी जबाबदारी पार पाडत आहात, त्यातून प्रेरणा घेऊन ‘जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, झडपोली, पालघर’ या संस्थेमार्फतत्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या भीषणतेत अनेक मुलं अनाथ झाली आहेत. दोन्ही पालकांना गमवावे लागलेल्या अशा अनाथ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याची तयारी जिजाऊ संस्थेतर्फे त्यांनी तयारी दर्शवली आहे. संस्थेच्या शाळांमध्ये या मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यासाठी शासकीय नियमांनुसार आवश्यक त्या नियम अटींची पूर्तता करण्याची तयारीही दर्शवली आहे.
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे उपक्रम
• ही संस्था पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत आहे.
• गेली १२ वर्षे ही संस्था शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार, शेती या पाच क्षेत्रांमध्ये मोफत सेवा पुरवत आहे.
• पालघरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात या संस्थेच्या सीबीएसई बोर्डाच्या पाच शाळा आहेत. तसेच एक दृष्टीहीनांची निवासी शाळाही आहे.
• या सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी मोफत पण दर्जेदार शिक्षण देतात.
• या शाळांसोबतच संस्थेचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयही आहे.
लिंक क्लिक करा आणि वाचा:
स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!
स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!