मुक्तपीठ टीम
आपल्या गौरवशाली इतिहासाला जपणे आपलीच जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण सर्व मिळून नक्की पार पाडू शकतो, या भावनेतून पुण्यातील काही तरुण एकत्र आले आणि स्थापना झाली झुंज या संस्थेची.
पुण्यातील एक ध्येयवेडा तरुण कार्यकर्ता आणि इतिहास अभ्यासक, लेखक मल्हार पांडे आणि त्यांच्या मित्रांच्या पुढाकाराने कार्यरत झुंजने सुरुवात केली ती पुण्यातील ऐतिहासिक स्थळांपासून. नानासाहेब पेशवे यांची समाधी खूपच दुर्लक्षित होती. झुंजच्या कार्यकर्त्यांनी समाधी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. झुंजने गेले वर्षभर सातत्याने पुना हॉस्पिटल जवळील समाधी स्थळ स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
नानासाहेब पेशवे यांच्या समाधीजवळील परिसराची स्वच्छता ‘झुंज’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच केली. यामध्ये संस्थेच्या जवळपास ७० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. त्यांनी या मोहिमेत ३० पोती कचरा गोळा केला. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ‘झुंज’च्या सदस्यांना कचरा गोळा करण्यासाठी गाडी, अवजारे व खराटे असे साहित्य दिले होते. ही मोहीम तीन पथके तयार करून राबवण्यात आली. पहिल्या पथकाने प्लॅस्टिक, झाडे-झुडपे काढली, तर दुसऱ्या पथकाने चित्रे स्वच्छ केली. तिसऱ्या पथकाने गवत काढण्याचे काम केले.
याच संस्थेने पुण्यातील पर्वती दर्शन मोहीमही आयोजित केली होती. ज्याही ऐतिहासिक स्थळांकडे दुर्लक्ष होत असतं, तिथं लक्ष वेधून त्यांची स्वच्छता करण्याबरोबरच संवर्धन करण्याचाही प्रयत्न मोहिमांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
टीम झुंज
- मल्हार पांडे – संस्थापक – अध्यक्ष
- सुश्रुत किनगे, सौरभ जगताप- उपाध्यक्ष
- रुतुराज काळे, रश्मीन कुलकर्णी – सचिव
- सिद्धार्थ राजे, अवधूत गोखले, चंद्रभूषण जोशी, राजस जोशी, स्वप्नील नहार, योगेश देशपांडे, वैभवी, पूजा बडेकर, प्रज्ञा सपकाळ, वैभव टिळेकर – झुंजचे सदस्य
पाहा व्हिडीओ: