पाणी हे जीवन. नेहमीच बोललं जातं. मात्र, आपलं सर्वाधिक दुर्लक्ष पाण्याकडेच, पाणी देणाऱ्या जलस्त्रोत्रांकडेच होतं. नवी मुंबईतील एन्व्हायरोमेंट लाइफ फाऊंडेशनचे धर्मेश बाराई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक मिशन म्हणून जलस्त्रोत स्वच्छतेचं, संवर्धनांचं काम हाती घेतलं आहे.