मुक्तपीठ टीम
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने जेईई मेन २०२१ परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली आहे. जेईई मेन परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी १६ जानेवारी रोजी संपत होती. तर आता ही मुदत एनटीएने २३ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
एनटीएने मुदत वाढिच्या संदर्भात एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्या परिपत्रकात म्हटले आहे की, ऑनलाइन अर्जांची प्रक्रिया १६ डिसेंबर २०२० पासून सुरू झाली असूम उमेदवार २३ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. तसेच अर्जाचे शुल्क भरण्याची अंतिम मुदत २४ जानेवारी २०२१ आहे.
जेईई मेन ही परिक्षा देशातील आयआयटी, एनआयटी आणि अन्य सीएफटीआय संस्थांमधील अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते.
तसेच यंदा तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.
इच्छूक विद्यार्थ्यांनी https://jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. विद्यार्थी एका किंवा एकापेक्षा अधिक टप्प्यातील परीक्षा देऊ शकतात. त्यांचे सर्वोतम गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तर जेईई मेन २०२१ साठी अर्जात दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी २७ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा विंडो ओपन होणार आहे. दुरुस्तीसाठी अखेरची मुदत ३० जानेवारी २०२१ आहे. तसेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.