मुक्तपीठ टीम
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी उद्भवल्या होत्या. मात्र, आता शासनाच्या प्रयत्नाने संपूर्ण राज्य ऑक्सिजनच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होत आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वयंनिर्मित ऑक्सिजन तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी असलेल्या मध्यवर्ती यंत्रणेमुळे आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
कळवण उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते काल बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य यतींद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे यांच्यासह कळवण उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांनीही मार्गदर्शन केले.