मुक्तपीठ टीम
जम्मू-काश्मीरमध्ये गैरमुस्लिमांवर वाढलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा खोऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवादी आता काश्मीरमध्ये गैरमुस्लिमांना त्यातही हिंदू आणि शिखांना लक्ष्य करून मारत आहेत. यामुळे पुन्हा एकदा काश्मिरी पंडित आणि शीख समाजातील लोक घाबरले आहेत आणि त्यातील काहींना स्थलांतर करण्यास भाग पडत आहे. यापासून गैरमुस्लिमांना वाचवण्यासाठी सरकारने त्यांना दहा दिवसांची सुट्टी दिली आहे. सरकारने स्वीकारलेला उपाय चर्चेचा विषय ठरला आहे.
दहशतवाद्यांपासून सुरक्षा, सुट्टीचा उपाय!
- काश्मिरात अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू, शिखांसारख्या समाजांना लक्ष्य केले जात आहे.
- दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने या समाजांमधील नागरिकांना भीतीपासून मुक्त होण्यासाठी नवीन उपयायोजना केली आहे.
- दहशतवाद्यांची भीती दूर करत गैरमुस्लिमांना सुरक्षित राखण्यासाठी सरकारने वेगळाच उपाय केला आहे.
- त्या समाजील नागरिकांना दिलासा देत १० दिवसांची सुट्टी दिली आहे.
- काश्मिरी पंडित आणि जम्मू-काश्मीरमधील इतर सर्व गैरमुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना सलग १० दिवसांची अधिकृत रजा देण्यात आली आहे.
सण साजरे करण्यासाठी आणि अल्पसंख्यांक समुदायावरील दहशतवादी हल्ल्यांमुळे निर्माण होणारी भीती काश्मीरमध्ये काम करणाऱ्या गैरमुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना १० दिवसांची विशेष सुट्टी देण्यात आली आहे. हे पाऊल अल्पसंख्यांक समाजाच्या मनातील भीती काही प्रमाणात कमी करेल असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. असे सांगितले जात आहे.
केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर प्रथमच विस्थापन
- नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांना लक्ष्य केल्यानंतर काश्मिर खोऱ्यात हिंदू शिखांमध्ये भीती पसरली आहे.
- अनेक हिंदू – शिख कुटुंबे आपला जीव वाचवण्यासाठी जम्मूला पळून गेली आहेत.
- काश्मिरी पंडितांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
- हल्ल्यांविरोधात जम्मूमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
काश्मीरी खोऱ्यात पुन्हा दहशतीचा नंगानाच
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी ५ दिवसात ७ जणांचा बळी घेतला.
- त्यापैकी ४ अल्पसंख्याक समुदायाचे होते आणि ६ हत्या राजधानी श्रीनगरमध्ये झाल्या.
- अलीकडेच श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी ईदगाह परिसरात असलेल्या शाळेवर हल्ला केला.
- दहशतवादी हल्ल्यात शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक मारले गेले. दोघेही मुस्लिम नव्हते.