मुक्तपीठ टीम
जळगाव जंक्शनवर पश्चिम रेल्वेच्या नागपूर आणि मनमाडकडे जाणाऱ्या मार्गांवर ये-जा असते, तर मनमाड जंक्शनला मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाव्यतिरिक्त दक्षिण मध्य रेल्वेची रहदारी असते. येथे तयार होणारा तिसरा मार्ग ही रहदारी सुरळीत करण्यास मदत करेल.
जळगाव-भडली जंक्शन दरम्यानच्या तिसर्या मार्गाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल, तर भुसावळ-भडली जंक्शनला जोडणारा तिसरा मार्ग यापूर्वीच कार्यान्वित झाला आहे.
भुसावळ-जळगाव चौथ्या मार्गाचे काम सुरू झाले असून ते २०२३ च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भूसंपादनाचे काही प्रश्न आहेत, त्यासाठी राज्य सरकारकडून मदत घेतली जात आहे.
मध्य रेल्वेने मात्र अजूनही नाशिकरोड ते तिरुपती मार्गे नांदेड किंवा कोकण रेल्वेमार्गे कन्याकुमारीकडे जाणारा मार्ग जोडण्याचा विचार केला नाही.
पाहा व्हिडीओ: