Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मविआतील छोट्या ४० घटक पक्षांमध्येही धुसफूस, जयदीप कवाडेंचा बाहेर पडण्याचा इशारा

May 22, 2022
in घडलं-बिघडलं
0
Jaydeep Kawade

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. नेहमीच सर्व घटक पक्षांना दुय्यम दर्जाची वागणूक तिन्ही पक्षांकडून मिळत आहे. तिन्ही पक्षांनी घटक पक्षांची वेळीच दखल घेतली नाही, तर महाविकास आघाडी मधील चाळीसपेक्षा जास्त असलेले पक्ष महाविकासआघाडी तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील असा झणझणीत इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.
युती सरकार असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील ४० पेक्षा जास्त पक्षांना सोबत घेऊन युती सरकारच्या विरोधात बिगुल फुंकले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर राज्यव्यापी तब्बल चार महायात्रा (दौरे) पीपल्स रिपब्लिकन पार्टी  ला सोबत घेऊन काढले.  काँग्रेस पक्षाने तर मागील पाच वर्षात युती सरकारच्या विरोधातील सर्व सभांमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी ची सात घेतली मात्र, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना त्याचा विसर पडत आहे, असा आरोप करीत २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला हे सुद्धा काँग्रेसने विसरू नये असा सूचक टोलाही यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी लावला.
 २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी असल्यामुळेच काँग्रेसचे मोजके आमदार निवडून आले, हे काँग्रेसने विसरू नये. फुले,शाहू, आंबेडकरी विचारांच्या मतांसाठी कॉंग्रेस निळ्या झेंड्याचा वापर करीत असेल तर २०१९ ची निवडणूक काँग्रेस नी लक्षात घ्यावी, असेही पीरीपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी सांगितले. महा विकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची विशेष बैठक बोलावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकासआघाडी तून बाहेर पडावे की नाही आणि पुढील वाटचाल काय यावर निर्णय घेतला जाईल असा इशारा यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

Tags: jaideep kawadeMva govtकाँग्रेसजयदीप कवाडेमहाविकास आघाडी सरकारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या गाभाऱ्याचं एक जूनपासून बांधकाम

Next Post

ट्रायचा अलर्ट: मोबाइल टॉवरसाठी भरघोस भाड्याचे आमिष! फसू नका, हे वाचा…

Next Post
TRAI Alert

ट्रायचा अलर्ट: मोबाइल टॉवरसाठी भरघोस भाड्याचे आमिष! फसू नका, हे वाचा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!