मुक्तपीठ टीम
आता इटेल नावाच्या कंपनीने आपल्या नवीन फोनद्वारे जबरदस्त फिचर्स आणले आहेत. व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सध्या कोणताही थेट पर्याय नाही. व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी बरेच लोक थर्ड पार्टी अॅप्सची मदत घेतात, पण आता असे करावे लागणार नाही. इटेल मोबाईल फोनने त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह लाखो यूजर्सची मने जिंकली आहेत. इटेल ए२३एसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये व्हॉट्अॅप कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
इटेल कंपनीने आता जबरदस्त इटेल ए२३एस लॉंच केला आहे जो भारतात एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. यात क्वाड कोअर प्रोसेसर आहे. याशिवाय यामध्ये एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. इटेल ए२३एसची किंमत ५ हजार २९९ रुपये ठेवण्यात आली असून हा स्काय सायन, स्काय ब्लॅक आणि ओशन ब्लू या रंगांमध्ये खरेदी करता येईल.
इटेल ए२३एसचे आकर्षक फिचर्स
- इटेल ए२३एसची डिझाईन जुन्या अँड्रॉईड फोन प्रमाणे आहे.
- फोनमध्ये ४८०×८५४ पिक्सेल रिझोल्यूशनसह ५-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे.
- फोनमध्ये २जीबी रॅमसह ३२जीबी स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येते.
- यामध्ये Unisoc SC9832E प्रोसेसर आहे जो क्वाड कोअर प्रोसेसर आहे.
- फोनमध्ये अॅंड्रॉईड ११ जीआय एडिशन देण्यात आले आहे.
- या इटेल स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईटसह समोर व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.
- याशिवाय, फोनमध्ये फेस अनलॉक, ४जी, वायफाय, ब्लूटूथ , जीपीएस + ग्लोनास आणि ड्युअल सिमची क्षमता आहे.
- व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगसोबतच यामध्ये पीक मोड, कॉल अलार्म आणि स्टेटस सेव्हिंग फिचर्स देण्यात आले आहेत.