मुक्तपीठ टीम
भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजेच इस्रोने ‘विकास’ या द्रव प्रोपेलेंट इंधनावरील इंजिनाची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. ही दीर्घ कालावधीची तिसरी यशस्वी औष्णिक चाचणी होती. या मोहिमेसाठी चार अंतराळवीरांनी यापूर्वीच रशियात अवकाशात उड्डाण करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
ही चाचणी जीएसएलव्ही एमके-३च्या एल-११० द्रव अवस्थेसाठी गगनयानच्या इंजिन पात्रता आवश्यकतेनुसार केली गेली. इस्रोच्या टेस्ट सेंटरमध्ये हे इंजिन २४० सेकंदासाठी लॉन्च केले गेले. या कालावधीत इंजिनने चाचणीची लक्ष्यं पूर्ण केल्यानं चाचणी यशस्वी झाली. इंजिन संपूर्ण कालावधीत मानक अंदाजानुसार कार्यरत होते.
मिशन गगनयान…अंतराळात माणूस!
• माणसांना पृथ्वीच्या कक्षेत पाठविणे आणि पृथ्वीवर परत आणणे यासाठी भारतीय प्रक्षेपण यंत्राची क्षमता दर्शविण्याचा उद्देश आहे.
• मानव रहित रहिवासी मिशन डिसेंबर २०२१ आणि दुसरे २०२२-२३ मध्ये सुरू केले जाईल.
• त्यानंतर ‘गगनयान’च्या माध्यमातून मानवांना अवकाशात पाठविण्याची योजना आहे.