मुक्तपीठ टीम
देशभरात महागाईविरोधात संताप वाढत असतानाच आता आणखी एका महागाईची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील हिंदू देवस्थानांच्या यात्रेसाठी सुरु करण्यात आलेल्या खास रेल्वे गाड्यांची तिकीट महाग झाली आहेत. त्यामुळे आजवर ज्या तिकीटासाठी १२ हजार द्यावे लागत त्याच तिकीटासाठी आता २० हजारांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या स्पेशल ट्रेनचे या आर्थिक वर्षापासून भाडेही वाढले आहे. यात्रेसाठी ज्या गाड्या २० लाख रुपयांमध्ये बुक केल्या जात होत्या, त्या आता ५० ते ६० लाख रुपयांमध्ये बुक केल्या जाणार आहेत.तसेच आता या गाड्यांच्या यात्रांना भारत दर्शन यात्रेऐवजी स्वदेश
कशी झाली महागाई?
रेल्वेतील माहितगारांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीने या महिन्यात २८ एप्रिल रोजी प्रयागराज संगम ते दक्षिण भारत जाणाऱ्या विशेष ट्रेनचे तिकीट १२ हजार १८५ रुपयांवरून २० हजार ४४० रुपये केले आहे.
स्टेशन भाडे सुरु केल्याने महागाईची झळ!
- आतापर्यंत रेल्वे स्थानकांवर आयआरसीटीसी गाड्यांच्या पार्किंगसाठी शुल्क आकारत नव्हती.
- मात्र आता प्रत्येक तासाचे शुल्क भरावे लागणार आहे.
- ट्रेन स्टेशनवर पोहोचताच चार्जिंग सुरू होईल.
- नवीन व्यवस्थेनुसार, आयआरसीटीसी मूळ स्थानकापासून गंतव्य स्थानकापर्यंत फक्त दोन थांब्यांसाठी शुल्क आकारणार नाही.
- यामुळे आयआरसीटीसीनेही प्रवास दर वाढवला आहे.
- याशिवाय भारत दर्शन यात्रेसाठी ज्या गाड्या २० लाख रुपयांमध्ये बुक केल्या जात होत्या, त्या आता ५० ते ६० लाख रुपयांमध्ये बुक केल्या जाणार आहेत.
- ‘भारत दर्शन ट्रेन आता स्वदेश दर्शन ट्रेनच्या नावाने चालणार आहे.
- ३१ मार्चपर्यंत या प्रवासासाठी रेल्वे अनुदान देत होती, ती आता थांबली आहे.
अनुदान बंद झाल्याचाही फटका
- नवीन आर्थिक वर्षापासून, भारत दर्शन यात्रेअंतर्गत आयआरसीटीसीचा रेल्वेसोबतचा करार संपला आहे.
- त्यामुळे प्रवाशांना मिळणारे अनुदान आता बंद करण्यात आले आहे.
- हा करार केवळ मार्च-२०२२ पर्यंत होता.
- रेल्वेने प्रवाशांना दिले जाणारे अनुदान बंद केल्यानंतर भारत दर्शन यात्रा टूर पॅकेजचे नावही बदलून स्वदेश दर्शन असे करण्यात आले आहे.
- नवीन सेवा शर्तींनुसार, प्रति व्यक्ती टूर पॅकेजचे दर पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहेत.
- आयआरसीटीसीच्या माध्यमातून देशातील धार्मिक स्थळांची यात्रा परवडणाऱ्या दरात केली जात असे.