मुक्तपीठ टीम
IRCTCने ओडिशातील भुवनेश्वर, चिल्का, कोणार्क आणि पुरीला भेट देण्यासाठी ४ दिवसांचे टूर पॅकेज तयार सादर केले आहे. या पॅकेज अंतर्गत प्रवासी महत्वाची मंदिरे आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतील. IRCTCने ओडिशामधील भुवनेश्वर, चिल्का, कोणार्क, पुरी येथे तीन रात्री आणि चार दिवसांचे टूर पॅकेज आणले आहे, ही माहिती IRCTC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे.
दिवस १: दिल्ली – भुवनेश्वर – पुरी
दिल्लीहून ०९:५५ वाजताची फ्लाइट भुवनेश्वरला १२:०० वाजता पोहोचल्यानंतर पुरी येथील हॉटेलमध्ये चेक इन कराणार त्यानंतर संध्याकाळी जगन्नाथ मंदिराला भेट दिली जाईल.
दिवस २: पुरी – चिल्का – पुरी
- न्याहारीनंतर, सतपदा (चिल्का) कडे जाणर.
- चिल्का तलावाकडे बोट राइड (स्वखर्चाने).
- बेट आणि इरावाडी डॉल्फिन साइटला भेट
- पुरी कडे परत जाताना वाटेत अल्लरनाथ मंदिराचे दर्शन
दिवस ३: पुरी कोणार्क – पुरी
नाश्त्यानंतर कोणार्कमधील कोणार्क मंदिर, चंद्रभागा बीच, गोल्डन सी बीच आणि बीच मार्केट ला भेट दिली जाईल.
दिवस ४: पुरी – भुवनेश्वर
हॉटेलमधून चेक आउट केल्यानंत भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिर, उदयगिरी आणि खंडगिरी आणि मुक्तेश्वर मंदिराची पर्यटन स्थळे पाहणी.
त्याचदिवशी ०६:४० वाजता भुवनेश्वर विमानतळावरुन निघाल्यानंतर ०९:१० वाजता दिल्ली विमानतळावर आगमन.
अशाप्रकारे हे ४ दिवसांचा टूर पॅकेज आहे.