Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

IRCTC सोबत विमानानं चला निसर्ग सौंदर्याची लयलूट असलेल्या आसामात!

November 9, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Assam tour by IRCTC

मुक्तपीठ टीम 

आपल्या देशातील सात बहिणी म्हणून ओळखली जाणारी ईशान्येतील सात राज्ये म्हणजे अतुलनीय सौंदर्याची लयलूटच. ही सर्व राज्य नैसर्गिक देखाव्यांनी आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाने नटलेली आहेत. इथली सातही राज्य पर्यटकांची नेहमीच आवडती ठिकाणं आहेत. याच सातमधील एक राज्य असणाऱ्या आसाम राज्यात जर तुम्ही गेलात तर एकदा जाणं कमीच वाटेल एवढी विविधता ठासून भरलेली आहे. या राज्याला भेट देण्याची संधी आता समोर आली आहे.

 

बिहू आणि नॉर्थ ईस्टमधील इतर अनेक संस्कृती जवळून जाणून घेण्यासाठी आसाम हे खूप चांगले ठिकाण आहे. हे भारतरत्न आणि महान संगीतकार भूपेन हजारिका यांचेही जन्मस्थान आहे. आसामला भेट देण्यासाठी IRCTC एक अतिशय आरामदायी हवाई टूर पॅकेजही देत आहे. IRCTC च्या या हवाई टूर पॅकेजची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यामध्ये तुम्हाला गुवाहाटी, आसाममधील काझीरंगा आणि मेघालयातील शिलाँगला भेट देण्याची संधी मिळेल. याशिवायही बरंच काही आहे. ते जाणून घेण्यासाठी मुक्तपीठ डॉट कॉमवरील चांगल्या बातम्यांमध्ये ही संपूर्ण बातमी नक्की वाचा.

 

शिलाँगचे दर्शन

  • आसाम पर्यटनाची सुरुवात पाटणा विमानतळावरून होणार आहे.
  • पाटणा येथून पर्यटक गुवाहाटीला जातील.
  • गुवाहाटीला पोहोचल्यावर प्रवाशांना शिलाँगला नेले जाईल.
  • शिलाँगला जाताना प्रवासी उमियम तलावाला भेट देतील.
  • शिलाँगला पोहोचल्यावर प्रवाशांना हॉटेलमध्ये नेले जाईल.
  • हॉटेलमध्ये थोड्या विश्रांतीनंतर, प्रवासी वॉर्ड्स लेक आणि लेडी हैदरी पार्क सारख्या ठिकाणांना भेट देतील.

 

चेरापुंजीसह इतर ठिकाणी भेट

  • दुसऱ्या दिवशी सकाळी, प्रवासी एलिफंटा फॉल्स, ड्वान सिएम व्ह्यू पॉइंट, नोह कालिकाई फॉल्स, मावसाई लेणी आणि सेव्हन सिस्टर फॉल्स सारख्या ठिकाणांसह चेरापुंजीला भेट देतील.
  • हॉटेलमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर, प्रवासी दुसऱ्या दिवशी डौकी (बांगलादेश सीमा) आणि नंतर आशियातील सर्वात स्वच्छ गाव मावलिनॉन्ग येथे जातील.

काझीरंगात हत्ती सफारीसह भटकंती

  • तिसऱ्या दिवशी प्रवासी काझीरंगासाठी रवाना होतील. काझीरंगा येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर, प्रवासी सकाळी स्वखर्चाने हत्ती सफारीचा आणि जीप सफारीचा आनंद घेऊ शकतात.
  • चौथ्या दिवशी प्रवासी कामाख्या मंदिर, नवग्रह मंदिर, उमानंद मंदिर आणि श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र या ठिकाणांना भेट देतील.
  • संध्याकाळी, पर्यटक ब्रह्मपुत्रा नदीवर क्रूझ सफारीचा आनंद घेऊ शकतात.
  • गुवाहाटीमध्ये रात्रीची विश्रांती घेतल्यानंतर प्रवासी पाटण्याला जातील.

 

IRCTC च्या या ६ रात्र आणि ७ दिवसांच्या टूर पॅकेजसाठी २९ हजार ८५० रुपये खर्च आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: assambihuGuwahatiirctckaziranganorth eastShillongआयआरसीटीसीआसामकाझीरंगागुवाहाटीनॉर्थ ईस्टबिहूशिलाँगला
Previous Post

माधुरी दीक्षितच्या मुलानं दोन वर्षे केस वाढवून कर्करोगग्रस्तांसाठी केले दान!

Next Post

मेट्रो-३चे काम वेगात, २६ स्टेशनांपैकी १६ स्टेशन्स ८० टक्के तयार!

Next Post
मेट्रो-३

मेट्रो-३चे काम वेगात, २६ स्टेशनांपैकी १६ स्टेशन्स ८० टक्के तयार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!