हनिफ पटेल
खाकी वर्दी आणि वाचनाचे दर्दी. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयानं सुरु केलेला उपक्रम पोलिसांचं वाचन वेड दाखवणाराच आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून फिरत्या पेटी वाचनालयाचा उपक्रम सुरु झाला आहे.
मराठी राजभाषा दिनानिमित्त राज्यभरात अनेक कार्यक्रम झाले मात्र मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकारानं सुरु झालेला एक उपक्रम हा वेगळाच आहे. त्याचा शुभारंभ नुकताच झाला. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून साकारलेलं खाकी वर्दीतील वाचन वेड्यांची भूक भागवणारं. पोलिसांकडील पेट्यांमध्ये पोलिसांची पुस्तकं. त्यातून सुरु झालाय फिरत्या पेटी वाचनालयाचा उपक्रम.
पोलिसांनी सुरु केलं, पोलीस ठाण्यांमधील फिरतं पेटी वाचनालय
मराठी राजभाषा दिनानिमित्त मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यात फिरतं वाचनालयाची संकल्पना राबवली आहे. प्रत्येक पोलिसांकडे स्वतःची पेटी असते, त्यातीलच एक पेटी घेत. त्यात प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने विकत घेतलेली किंवा त्याच्याकडे असलेली पुस्तके त्या पेटीत टाकायची आणि वाचायची. त्यानंतर तीन महिन्यानंतर प्रत्येक पोलीस ठाण्याची पेटी इतर पोलीस ठाण्यात फिरत राहणार. एका पोलीस ठाण्यातील पुस्तके दुसऱ्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाचता येणार आहेत, अशा माहिती पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली.
पोलीस आयुक्त सदानंद दातेंची संकल्पना
मराठी भाषा आणि साहित्यातील सौंदर्य सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा आस्वाद घेता यावा. यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी ही संकल्पना राबवण्याच ठरवलं आहे. यावेळी वसई विभागातील कवी, लेखक, साहित्यिक, संपादक यांचा ही गौरव करण्यात आला.