आयफोनचे उत्पादन करणारी फॉक्सकॉन अमेरिकेत टेस्लाशी स्पर्धा करणाऱ्या फिस्कर इंक यांच्या सहकार्याने भारतात इलेक्ट्रिक कार बनवणार आहेत. फिस्करचे भारतीय कनेक्शन देखील आहे. त्याची सह-संस्थापक भारतीय आहे. तिचे नाव गीता गुप्ता फिस्कर असे आहे.
फिस्करच्या कारचे उत्पादन भारतात फॉक्सकॉन करेल. फिस्कर ब्रँडखाली त्या कारची विक्री केली जाईल. फॉक्सकॉन सध्या भारतात आयफोनचे उत्पादन करते.
इलेक्ट्रिक कारला उत्तर अमेरिका, युरोप, चीन आणि भारत यांसारख्या बाजारपेठा लक्षात घेऊन डिझाइन केले जाईल. फॉक्सकॉनने ऑक्टोबर २०२० मध्ये पहिली ईव्ही चेसिस सादर केली. फॉस्करकॉनकडून फिस्कर यांच्या भागीदारीत दरवर्षी २,५०,००० पेक्षा जास्त ई कारच्या उत्पादनाचे लक्ष्य आहे.
कंपनीने एक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म देखील बाजारात लॉन्च केला आहे. हा प्लॅटफ़ॉर्म मोटार कंपन्यांना नवीन मॉडेल्स सादर करण्यात मदत करेल. चौथ्या तिमाहीत फॉक्सकॉनच्या माध्यमातून दोन हलकी वाहने आणली जातील. फॉक्सकॉनची विशेष इलेक्ट्रिक बस उत्पादन सुरू करण्याचीही योजना आहे.
पाहा व्हिडीओ: