मुक्तपीठ टीम
जिथे तिथे चर्चा आयफोनची झाली, तिथे नावाला आयफोनला भलतीच डिमांड आली… आयफोनने नादच केलाय थेट! आयफोन १३ नंतर लोकांना वाटत आहे आता आयफोनची १४ सीरीज येईल पण, याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही. लीक झालेल्या माहितीनुसार आयफोन १५ सीरीज येणार असे म्हटले जात आहे. अॅप्पलने आयफोन १५ च्या प्रोटोटाइपची चाचणी सुरू केली आहे. रिपोर्टनुसार, आयफोन १५ च्या प्रो मॉडेलमध्ये 5x टेलीफोटो पेरिस्कोप लेन्स उपलब्ध असेल. आता पर्यंत फक्त अँड्रोइडमध्ये असलेली ही लेन्स आय़फोनच्या जबरदस्त कॅमेऱ्यासोबत आली तर धमालच होणाराय.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या या फोनच्या पार्ट्सची चाचणी सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर, २०२३ च्या आयफोन लाइनअप म्हणजेच आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्सला पेरिस्कोप लेन्स मिळेल.
स्मार्टफोनला पेरिस्कोप मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. पेरिस्कोप लेन्स असलेले अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन्स आधीपासूनच आहेत, परंतु आयफोनला पहिल्यांदाच पेरिस्कोप लेन्स मिळणार आहेत.
आता एक नवीन दावा केला जात आहे की, आयफोन १४ सीरिजसह नॉच काढला जाईल. ब्लूमबर्गच्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, आयफोन १४ सीरिजला आयफोनचा आयकॉनिक नॉच मिळणार नाही. १४ सीरिजच्या आयफोनला पिल शेप पंचहोल डिस्प्ले दिला जाईल. याशिवाय फोनमध्ये अंडर डिस्प्ले फेस आयडी उपलब्ध असेल आणि इतर आवश्यक सेन्सर्सही डिस्प्लेखाली असतील.
आयफोन १४ सीरीजचे प्रो मॉडेल पिल शेपमध्ये ऑफर केले जाईल, तर रेग्युलर मॉडेल जुन्या नॉचसह रिलीज केले जाईल. एका कोरियन वेबसाइटने दावा केला आहे की, अॅप्पस आयफोन १४ प्रो आणि १४ प्रो मॅक्ससह पंचहोल डिस्प्ले देईल.
पाहा व्हिडीओ: