मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाच्या काळातही रुग्णांचे शोषण करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. विमा नियामक प्राधिकरणाने या शोषणाची गंभीर दखल घेतली आहे. विमा नियामक प्राधिकरणाने विमा कंपन्यांना कोरोना रूग्णांकडून उपचारादरम्यान जास्त पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कॅशलेस उपचार न देणाऱ्या रुग्णालयांची यादीही त्यांना सादर करण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या रूग्णांकडून उपचारासाठी जास्त शुल्क उकळले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयआरडीएने विमा कंपन्यांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच आताही अनेक आरोग्य विमाधारक सोशल मीडियाद्वारे विमा कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस उपचार दिले जात नसल्याविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी संबंधित कंपन्यांकडे तक्रारही केल्या आहेत. विमा नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आरोग्य विमा अधिनियम २०१६च्या अंतर्गत रुग्णालयांना कॅशलेस आधारावरील दाव्यांना त्वरित मार्गी लावावे लागेल.
प्रभावी कम्युनिकेशन चॅनेल तयार करण्याचे निर्देश
- आयआरडीएने विमाधारकास आवश्यक ती माहिती देण्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
- कोरोना संकटाच्या वेळी विमाधारकांकडून आवश्यक असलेल्या माहितीबद्दल चौकशीचे प्रमाण वाढले आहे.
- प्रभावी कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध करुन विमाधारकांना योग्य माहिती सहज मिळेल, याची व्यवस्था करा.
विमाधारकांना मिळणार दिलासा
- कोरोना संकटात रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधा मिळत नसल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विमा प्राधिकरणाला कॅशलेस दावे फेटाळल्याच्या तक्रारींवर विमा कंपन्यांविरोधात त्वरित कारवाई करण्यास सांगितले.
- रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली जास्त शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याचीही गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले.
- विमाधारकांचे म्हणणे आहे की रुग्णालय कोरोना उपचारासाठी वेगवेगळे शुल्क आकारत आहे. अनावश्यक शुल्कवसुलीच्याही तक्रारी आहेत.
- विमा प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमुळे आरोग्य विमा घेतलेल्यांना फायदा होईल.
कोरोनावर कॅशलेस उपचारही करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळेल.
जे रुग्णालय रुग्णांना इतर आजारांसाठी कॅशलेस उपचारांची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता कोरोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागेल.
मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाच्या काळातही रुग्णांचे शोषण करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. विमा प्राधिकरणाने या शोषणाची गंभीर दखल घेतली आहे. विमा प्राधिकरणाने विमा कंपन्यांना कोरोना रूग्णांकडून उपचारादरम्यान जास्त पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कॅशलेस उपचार न देणाऱ्या रुग्णालयांची यादीही त्यांना सादर करण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या रूग्णांकडून उपचारासाठी जास्त शुल्क उकळले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमा प्राधिकरणाने विमा कंपन्यांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आता कोरोना उपचारांसाठी कॅशलेस उपचार मिळण्याबरोबच गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कडक नजर राहणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच आताही अनेक आरोग्य विमाधारक सोशल मीडियाद्वारे विमा कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस उपचार दिले जात नसल्याविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी संबंधित कंपन्यांकडे तक्रारही केल्या आहेत. विमा नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आरोग्य विमा अधिनियम २०१६च्या अंतर्गत रुग्णालयांना कॅशलेस आधारावरील दाव्यांना त्वरित मार्गी लावावे लागेल.
प्रभावी कम्युनिकेशन चॅनेल तयार करण्याचे निर्देश
- विमा प्राधिकरणाने विमाधारकास आवश्यक ती माहिती देण्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
- कोरोना संकटाच्या वेळी विमाधारकांकडून आवश्यक असलेल्या माहितीबद्दल चौकशीचे प्रमाण वाढले आहे.
- प्रभावी कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध करुन विमाधारकांना योग्य माहिती सहज मिळेल, याची व्यवस्था करा.
विमाधारकांना मिळणार दिलासा
- कोरोना संकटात रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधा मिळत नसल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विमा प्राधिकरणाला कॅशलेस दावे फेटाळल्याच्या तक्रारींवर विमा कंपन्यांविरोधात त्वरित कारवाई करण्यास सांगितले.
- रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली जास्त शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याचीही गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले.
- विमाधारकांचे म्हणणे आहे की रुग्णालय कोरोना उपचारासाठी वेगवेगळे शुल्क आकारत आहे. अनावश्यक शुल्कवसुलीच्याही तक्रारी आहेत.
- विमा प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमुळे आरोग्य विमा घेतलेल्यांना फायदा होईल.
- कोरोनावर कॅशलेस उपचारही करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळेल.
- जे रुग्णालय रुग्णांना इतर आजारांसाठी कॅशलेस उपचारांची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता कोरोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागेल.