मुक्तपीठ टीम
ज्या ग्राहकोपयोगी वस्तूमध्ये एकापेक्षा जास्त घटक असतात त्या वस्तूच्या दोन किंवा अधिक मुख्य घटकांच्या प्रमाणाची घोषणा पॅकबंद वस्तूच्या पाकिटावर दर्शनी बाजूला ब्रँडचे नाव / बोधचिन्हासोबत असावी, अशी तरतूद केंद्र सरकारने वैध मापन (पॅकबंद वस्तू) नियम, २०११ मध्ये प्रस्तावित केली आहे.दोन किंवा अधिक प्रमुख घटकांच्या घोषणेमध्ये, उत्पादनाची टक्केवारी / वैशिष्ठ्यपूर्ण विक्री (युनिक सेलिंग पॉईंट) प्रमाण / वैशिष्ठ्यपूर्ण विक्री प्रस्ताव (यूएसपी ) समाविष्ट असेल आणि वैशिष्टयपूर्ण विक्रीचे (युनिक सेलिंग पॉईंट) प्रमाण / वैशिट्यपूर्ण विक्री प्रस्ताव (यूएसपी ) घोषित करताना अक्षराचा आकार एकसारखाच असायला हवा. ही तरतूद यांत्रिक किंवा इलेक्ट्रिकल वस्तूसाठी लागू होणार नाही.
वस्तू उत्पादक/पॅकबंद करणारे /आयातदार पॅकबंद वस्तूच्या दर्शनी बाजूला ठळकपणे मुख्य घटकांच्या प्रमाणासह महत्त्वाच्या घोषणा करत नसल्याचे निदर्शनाला आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पॅकबंद वस्तूच्या दर्शनी बाजूला उत्पादनाचा वैशिष्टयपूर्ण विक्रीचे (युनिक सेलिंग पॉईंट) प्रमाण / वैशिट्यपूर्ण विक्री प्रस्ताव (यूएसपी) चे प्रमाण टक्केवारीशिवाय घोषित करणे हे ग्राहकांच्या माहिती मिळवण्याचा अधिकाराविरुद्ध आहे.
वैध मापन (पॅकबंद वस्तू ) नियम, २०११ अंतर्गत, ग्राहकांच्या हितासाठी, सर्व सर्व पॅकबंद वस्तूंवर उत्पादक/ पॅकबंद करणारे / आयातदाराचे नाव आणि पत्ता, मूळ देश, वस्तूचे सामान्य किंवा मूळ नाव, निव्वळ प्रमाण, उत्पादनाचा महिना आणि वर्ष, एमआरपी, ग्राहक सेवा तपशील यासारख्या काही घोषणा जाहीर करणे बंधनकारक आहे.
उदाहरणार्थ, समजा एखादे उत्पादन त्याच्या युनिक सेलिंग पॉइंट / युनिक सेलिंग प्रपोझिशनसह (यूएसपी )’एक्स ‘ आणि ‘वाय ‘ घटक म्हणून विकले जात असल्यास प्रस्तावित तरतुदीनुसार, उत्पादक / पॅकबंद करणारे / आयातदार यांना पॅकबंद वस्तूच्या दर्शनी बाजूला ‘एक्स ‘आणि ‘वाय ‘ घटकाचे नाव आणि प्रमाण घोषित करणे आवश्यक आहे.हे प्रमाण पॅकबंद वस्तूवर ज्याप्रकारे ‘एक्स ‘ आणि ‘वाय ‘ घटकांचे नाव घोषित केले आहे तशाच प्रकारच्या अक्षरात “५०%” किंवा “५० टक्के” किंवा “पन्नास टक्के” याप्रमाणे टक्केवारीत घोषित केले जाईल.
कंपनीच्या ब्रँडचे नाव / बोधचिन्हासह पॅकबंद वस्तूच्या दर्शनी बाजूला वस्तूमधील दोन किंवा अधिक प्रमुख घटक घोषित करण्याच्या संदर्भात उद्योग, संघटना, ग्राहक, स्वयंसेवी ग्राहक संस्था आणि इतर भागधारकांसह सर्व संबंधित/ भागधारकांकडून जाहीर सूचना / मते मागविण्यात येत आहेत.
मते /सूचना js-ca@nic.in, dirwm-ca@nic.in आणि ashutosh.agarwal13@nic.in वर ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सादर केल्या जाऊ शकतात. किंवा प्रत्यक्षपणे संचालक, वैध मापन, कृषी भवन, नवी दिल्ली-०१ येथे सादर करता येतील.