Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

वयाच्या ४० व्या वर्षीही सोडली नाही जिद्द, अखेर प्रयत्नांना यश…प्रवीण तांबेंची संघर्षमय कथा

March 24, 2022
in featured, चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
kaun hai Praveen Tambe?

मुक्तपीठ टीम

क्रीडाक्षेत्रात तर त्या वयात अनेकजण निवृत्ती जाहीर करतात. क्रिकेटर प्रवीण तांबेंना मात्र क्रिकेट पदार्पणाची संधी मिळाली तीच चाळीशीत. त्यांनी संधीचं सोनंही केलं. त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर कौन प्रवीण तांबे? चित्रपटही बनवण्यात आलाय.
पस्तीशीनंतर मध्यमवयात नवं काही वेगळं करायची अनेकांची जिद्दच हरपते. आजकाल ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकू येतं ते चाळीशीनंतरच्याच अर्ली रिटायरमेंट प्लॅनबद्दल. त्याचवेळी एका भारतीय क्रिकेटरला संधी मिळाली तीच चाळीशीत. नाव प्रवीण तांबे. अनेकदा त्यांचे नाव समोर आले की, लोक विचारतात, प्रवीण तांबे कोण? आता याच नावाने हिंदी आणि इतर काही दाक्षिणात्य भाषांमध्ये चित्रपट येत आहे, “कौन प्रवीण तांबे?”

 

Kaun hai Pravin Tambe? Cricket ka most experienced debutante, and the most inspiring cricket story never told.#KaunPravinTambe, trailer out on 9th March.#DisneyPlusHotstarMultiplex@legytambe @anjalipofficial @paramspeak @AshishVid @jaypraddesai pic.twitter.com/UD8ZqF1HyE

— Shreyas Talpade (@shreyastalpade1) March 7, 2022

 

अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रवीण तांबे यांनी क्रिकेटला आपले सर्वस्व मानले. त्यांना आयुष्यात खूप उशीरा योग्य मार्गदर्शक सापडला. पण, प्रवीण तांबेन कायमच आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतली. तो म्हणतो, “मला ज्या वयात संधी मिळाली त्या वयात तंदुरुस्त राहणं खूप गरजेचं आहे.” “कौन प्रवीण तांबे?” या बायोपिकमधील त्यांच्या भूमिकेसाठी निवड झालेल्या श्रेयस तळपदेनेही तेच केलं. चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्यांनी या व्यक्तिरेखेसाठी जोरदार तयारी केली. प्रवीण तांबे यांनी जे खाल्ले ते त्यांनी खाल्ले. ही भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी श्रेयस तळपदेने प्रवीण तांबेसोबत अनेक तास नेटवर घालवले. चित्रिकरणाआधी प्रवीण तांबेंसारखे मनगट फिरवून चेंडू टाकायला शिकला तेव्हा श्रेयसही आनंदी झाला. प्रवीण तांबे यांच्या आयुष्याचा एक भाग बनलेल्या सर्व गोष्टी त्यांनी केल्या.

 

Reel Tambe Challenging the Real Tambe.#KaunPravinTambe streaming from 1st April on #DisneyPlusHotstarMultiplexhttps://t.co/lmttUdSmvi pic.twitter.com/2UCWwO3WSt

— Bootroom Sports (@BRSMLLP) March 23, 2022

 

कोण आहेत प्रवीण तांबे?

  • प्रवीण तांबे हे नाव क्रिकेट जगणाऱ्या, क्रिकेटवर जीवनापेक्षा जास्त मानणाऱ्या एका क्रिकेटरचं आहे.
  • चित्रपटाचे नाव ‘कौन प्रवीण तांबे?’ असे असले तरीही क्रिकेटप्रेमींसाठी हे नाव अनोळखी नाही.
  • त्यांची ओळख मजबूत करण्यात त्याच्या फिरकी फेकणाऱ्या मनगटाचा सर्वात मोठा वाटा आहे.
  • चेंडूचा वेग, खेळपट्टीवर आदळल्यानंतर त्याच्या मार्गात होणारा बदल आणि बाऊन्सनंतर चेंडू फिरवणं या सगळ्यावर जादू प्रवीण तांबेचं खास फिरवलेलं मनगट करतो.
  • प्रवीण तांबे यांची कीर्ती अशी आहे की, ते केवळ आयपीएलमध्येच नाही तर परदेशी क्रिकेट लीगमध्येही खेळू लागले आहेत.

 

किरण यज्ञोवीत लिखित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘कौन प्रवीण तांबे?’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर १ एप्रिल प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूमध्येही प्रदर्शित होत आहे.

 

He believed in rising with the challenges and conquering them ⚾
Watch the trailer of #KaunPravinTambe now.
Streaming from 1st April on #DisneyPlusHotstarMultiplexhttps://t.co/t1UnPpy5Nc pic.twitter.com/bngwzjiGhr

— Pravin Vijay Tambe (@legytambe) March 19, 2022

 

या चित्रपटाचा संपूर्ण फोकस या गोष्टीवर आहे की वय हे आयुष्यात काहीच नसते. जर माणसाला खरी आवड असेल. समाजाच्या दुर्लक्षावर मात करण्याची जिद्द असेल आणि कष्ट करत राहण्याची जिद्द असेल तर काहीही होऊ शकते. प्रवीण तांबे म्हणतात, ते कुणीही विसरु नये असंच प्रेरणादायी. ‘यशासाठी चांगलं काम करणं आणि योग्य संधी मिळणं, यापेक्षा महत्त्वाचं आहे, ही संधी येईपर्यंत खचून न जाता चांगलं करत राहण्याची जिद्द बाळगणं जास्त महत्त्वाचं आहे.’

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Actor Shreyas TalpadeConflicting storycricketer Praveen Tambegood newskaun hai Pravin Tambe?muktpeethSports fieldअभिनेता श्रेयस तळपदेकौन है प्रवीण तांबे?क्रिकेटर प्रवीण तांबेक्रीडाक्षेत्रचांगली बातमीमुक्तपीठसंघर्षमय कथा
Previous Post

राज्यात १४९ नवे रुग्ण, २२२ रुग्ण बरे! मुंबई ४६, नागपूर ३, नाशिकमध्ये एकही नवा रुग्ण नाही!!

Next Post

मुंबईच्या जिया रायची कमाल, विक्रमी वेळेत केली पाल्कची सामुद्रधुनी पार!

Next Post
jia rai

मुंबईच्या जिया रायची कमाल, विक्रमी वेळेत केली पाल्कची सामुद्रधुनी पार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!