मुक्तपीठ टीम
शत्रूंच्या नौकांना सहज चकवणारे प्रगत ‘स्टेल्थ’ वैशिष्टय असलेली ‘आयएनएस वेला’ ही चौथी पाणबुडी गुरुवारी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंग यांच्या उपस्थितीत कार्यान्वित झाली. ही पाणबुडी १८ पाणतीरांनी सुसज्ज आहे. लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित पाणतीर म्हणजेच टॉर्पेडोसोबतच नौकाविरोधी क्षेपणास्त्रेही आहेत. त्यामुळे अरबी समुद्रातील सुरक्षा आणखी तगडी करण्याच्या दृष्टीने नौदलाला हे ‘कवच’ मिळाले आहे. स्कॉर्पिन क्लासमधील पाणबुड्या भारतात मुंबईतील माझगाव गोदीत, मेसर्स नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने तयार केल्या जात आहेत. चौथ्या पाणबुडीचे कार्यान्वित होणे, हा आजचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या पाणबुडीच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 75 चा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आयएनएस वेला ही अत्याधुनिक पाणबुडी आता पश्चिमी नेव्हल कमांडचा भाग असणार आहे. या पाणबुडीमध्ये आधुनिक हेरगिरीविषयक वैशिष्ट्ये आहेत आणि तिच्यावर लांब पल्ल्याची जल क्षेपणास्त्रे तसेच जहाजरोधी क्षेपणास्त्रे बसविलेली आहेत. प्रोजेक्ट-75 च्या सहा पाणबुड्यांच्या मालिकेतील चौथी पाणबुडी, ‘आयएनएस वेला’ 25 नोव्हेंबर 21 रोजी नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली.
मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे हा औपचारिक सोहळा झाला. फ्रान्सच्या मे. नेव्हल ग्रुपच्या (पूर्वीची डीसीएनएस) सहकार्याने मुंबईतल्या माझगाव डॉक शिपयार्डस लिमिटेडद्वारे स्कॉर्पिन श्रेणीतल्या पाणबुड्या बांधल्या जात आहेत. नौदलाच्या ताफ्यात या श्रेणीतली चौथी पाणबुडी समाविष्ट होणे हा आजचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आयएनएस वेला ही पश्चिम नौदल कमांडच्या पाणबुडीच्या ताफ्याचा भाग असेल आणि शस्त्रागाराचा आणखी एक शक्तिशाली भाग असेल.
खासदार अरविंद सावंत, पश्चिमी नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अडमिरल आर. हरी कुमार, माझगाव जहाजबांधणी गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉईस अडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी आयएनएस वेला या पाणबुडीच्या नौदल सेवेत दाखल झाल्यानिमित्त आयोजित समारंभात उपस्थित होते.
#INSVela commissioned into the #IndianNavy today #25Nov21.#Watch as the naval ensign is hoisted for the first time onboard.#HappyHunting@indiannavy @DDNewslive @airnewsalerts @PBNS_India pic.twitter.com/F7WHrAXNfx
— PRO Defence Mumbai (@DefPROMumbai) November 25, 2021
‘वेला’मुळे भारतीय नौदलाची वाढली क्षमता!
- स्कॉर्पिन पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली असून त्यात प्रगत स्टेल्थ (गुप्त) वैशिष्ट्ये आहेत.
- त्या लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित पाणसुरूंग तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत.
- या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक ‘सोनार’ आणि सेन्सर संच असल्याने त्यांच्यात उत्कृष्ट कार्यान्वयन क्षमता असते.
- त्यांच्याकडे प्रॉपल्शन मोटर म्हणून प्रगत परमनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर (PERMASYN) देखील आहे.
मुंबईच्या माझगाव डॉकने दाखवली क्षमता!
- ‘वेला’ची निर्मिती हे नौदलाद्वारे स्वयंनिर्मितीच्या क्षमतांना ‘बिल्डर्स नेव्ही’ म्हणून आपले स्थान मजबूत करण्याच्या दिशेने देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाचे फळ आहे.
- तसेच एक प्रमुख जहाज आणि पाणबुडी बिल्डिंग यार्ड म्हणून माझगाव डॉक लिमिटेडच्या क्षमतांचेही द्योतक आहे.
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘सुवर्ण विजय वर्ष’ या सोहळ्यांसोबत पाणबुडीच्या जलावतारणाचा हा सुवर्णयोग साधला जात आहे.
- संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी आजच्या समारंभाला उपस्थित होते.
- पूर्वीच्या ‘वेला’ या रशियन वंशाच्या २००९मध्ये सेवानिवृत्त झालेल्या फॉक्सट्रॉट श्रेणीतील पाणबुडीचे सदस्य या वेळी पाहुण्यांमध्ये उपस्थित होते.
Carrying the legacy forward in a New Avatar, #Vela to be commissioned into the #IndianNavy today.
The erstwhile #INSVela was commissioned on 31 Jul 1973 & served for 37 glorious years.
📷 The Old & The New pic.twitter.com/ADnQtcMK0F
— SpokespersonNavy (@indiannavy) November 25, 2021
लिंक क्लिक करा आणि वाचा: ‘वेला’ पाणबुडी म्हणजे कारवाया फत्ते करणारं शक्तिशाली माध्यम : नौदल प्रमुख