Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विविध क्षेत्रातील प्रशिक्षणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन”

March 17, 2021
in सरकारी बातम्या
0
“विविध क्षेत्रातील प्रशिक्षणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन”

सौ. इंडिया मार्ट


मुक्तपीठ टीम

            मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना व प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

            मुंबई शहर जिल्ह्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच दादर, आग्रीपाडा, लोअर परेल, मांडवी येथील शासकीय तंत्रशाळा तसेच खाजगी प्रशिक्षण संस्थामार्फत पॉवर, टेलिकॉम, कन्स्ट्रक्शन, अॅपरल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेल इत्यादी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरिता सर्व्हेअर, ई-वेस्ट कलेक्टर, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मोबाईल फोन हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन, डिस्ट्रीब्युशन लाईनमन, रिटेल ट्रेनी असोसिएट, हॅन्ड ॲब्रायडर, सेल्फ एम्प्लॉईड टेलर, सुइंग मशीन ऑपरेटर इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुलुंड, कुर्ला, गोवंडी, अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच पात्र खाजगी प्रशिक्षण संस्थांमार्फत आयटी, पॉवर, टेलिकॉम, टूरिजम, रिटेल, हेल्थकेअर, ऑटोमोटीव्ह इत्यादी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांकरीता डाटा एंन्ट्री ऑपरेटर, वेल्डर, कॅप्टन, शेफ, कार वॉशर, कॉम्प्युटर नेटवर्कीग, जनरल ड्युटी असिस्टंट, रिटेल ट्रेनी इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण कार्यक्रम मोफत असून याकरीता अभ्यासक्रमांच्या आवश्यकतेनुसार इयत्ता पाचवी पास ते दहावी पास, आयटीआय, पदविकाधारक, पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना परिक्षेअंती रोजगार, स्वयंरोजगाराची संधी देखील प्राप्त होणार आहे.

 

            इच्छुक उमेदवारांनी मुंबई शहर कार्यालयाकडे ०२२-२२६२६३०३ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा mumbaicity.employment@gmail.com या ईमेलवर तर मुंबई उपनगर कार्यालयाकडे ०२२-२२६२६४४० या दूरध्वनी क्रमांकावर अथवा mumbaisuburbanrojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांनी केले आहे.


Tags: औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकौशल्य विकास कार्यक्रम
Previous Post

“महिला व बालकांवरील अत्याचारासंदर्भातील घटनांचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलतेने व्हावे”

Next Post

पंतप्रधानांचा इशारा, कोरोना गावात पोहचला तर रोखणे कठीण!

Next Post
pmo

पंतप्रधानांचा इशारा, कोरोना गावात पोहचला तर रोखणे कठीण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!