स्टील स्लॅग म्हणजे पोलाद निर्मिती प्रक्रियेतील टाकाऊ उत्पादन असणारी पोलादाची भुकटी. त्याच्यापासून तयार केलेल्या पहिला सहापदरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गुजरातमध्ये सूरत येथे हा टाकाऊतून टिकाऊ महामार्ग बांधण्यात आला आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण नुकतेच झाले. गुजरातमधील सुरत येथील बंदराला शहराशी जोडणारा हा महामार्ग आहे.