मुक्तपीठ टीम
भारतात पहिली एबीबी फॉर्मुला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप हैदराबादमध्ये आयोजित केली जाणार आहे. जगातील आघाडीची एनर्जी ट्रान्झिशन आणि डिकार्बनायजेशन सोल्युशन्स पुरवणारी कंपनी ग्रीनकोने या चॅम्पियनशिपला पाठिंबा दिला आहे.
या चॅम्पियनशिपसाठी चाहते खूप उत्सुक आहेत, त्यांची उत्सुकता आणि उत्साहामध्ये भर पडावी यासाठी २०२३ एस हैदराबाद ई प्रिक्सने आज नवी दिल्लीमध्ये एका फॉर्मुला ई शो कारचे अनावरण करून ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत १०० दिवसांचा काउंटडाऊन सुरु केला आहे. भारत पहिल्यांदाच २०२३ मध्ये या चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवणार असून, २०२६ पर्यंत ही चॅम्पियनशिप भारतात होईल.
यावेळी भारताचे माननीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री. हरदीप पुरी, नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत, फॉर्मुला ईचे सह-संस्थापक आणि मुख्य चॅम्पियनशिप अधिकारी श्री अल्बर्टो लोंगो, एस नेक्स्ट जेनचे संस्थापक, ग्रीनको ग्रुपचे सीईओ आणि एमडी अनिल कुमार चलमालशेट्टी व तेलंगणा सरकारचे प्रतिनिधी म्हणून स्पेशल चीफ सेक्रेटरी अरविंद कुमार, आयएएस, एमएअँडयुडी हे मान्यवर उपस्थित होते.
याआधीच्या आठ सीझन्समध्ये (वर्षांमध्ये) एबीबी एफआयए फॉर्मुला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपने जगभरातील चाहत्यांना भारून टाकले आहे. आजवर जगभरातील २१ शहरांमध्ये १०० रेसेस झाल्या आहेत. जगभरात इलेक्ट्रिक गाड्यांचा विकास, त्यांच्याविषयी जागरूकता आणि त्यांच्या लोकप्रियतेला प्रोत्साहन देण्यावर या चॅम्पियनशिपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. येत्या सीझनमध्ये फॉर्मुला ई चाहत्यांना ११ टीम्स व २२ ड्रायव्हर्सना जगातील प्रसिद्ध शहरांमध्ये नव्या जेन३ ला रेस करताना पाहण्याची संधी मिळेल, यामध्ये भारतातील महिंद्रा समूहाची महिंद्रा रेसिंग फॉर्मुला ई टीम देखील सहभागी असेल.
यजमान शहरांपैकी एक हैदराबादमध्ये नवव्या सीझनच्या एकूण १७ रेसेसपैकी राउंड ४ जानेवारी व जुलै २०२३ मध्ये होणार आहे. प्रसिद्ध हुसेन सागर तलावाच्या आसपास सिटी सर्किटवर इलेक्ट्रिक जेन३ फॉर्मुला ई कारना रेस करताना पाहणे हा एक अतिशय रोमांचक अनुभव ठरेल.
तेलंगणा सरकारचे माहिती तंत्रज्ञान, नगरपालिका प्रशासन आणि शहरी विकास विभागाचे माननीय मंत्री श्री. के टी रामाराव यांनी हैदराबादहुन सांगितले, “आमच्या शहरामध्ये फॉर्मुला ई चॅम्पियनशिपच्या निमित्ताने येत असलेल्या जगभरातील रेसिंग चाहत्यांचे स्वागत करणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असणार आहे. जगातील १३ शहरांमध्ये या रेसेस होणार आहेत आणि त्यापैकी एक हैदराबाद असणार आहे याचा आम्हाला गर्व आहे. आम्हाला आनंद वाटतो की, पर्यावरणस्नेही प्रथा स्वीकारून त्यांच्याविषयी जागरूकता वाढवणे तसेच जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने स्वीकारली जाण्याला प्रोत्साहन देणे हा देखील या चॅम्पियनशिपचा उद्देश आहे.”
फॉर्मुला ईचे सहसंस्थापक व चीफ चॅम्पियनशिप ऑफिसर श्री. अल्बर्टो लोंगो यांनी सांगितले, “भारतात एबीबी एफआयए फॉर्मुला ई वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन पहिल्यांदा होत आहे आणि या निमित्ताने आम्ही आमच्या इथल्या नव्या चाहत्यांसाठी नवी जेन३ कार प्रस्तुत करत आहोत, आम्हाला याचा खूप आनंद होत आहे. इकडे येण्याची आमची खूप वर्षांपासूनची इच्छा होती, आणि आता ११ फेब्रुवारी रोजी हैदराबादमध्ये रेसिंगची सुरुवात होत आहे त्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.
भारतात फॉर्मुला ई च्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे, हे सर्व चाहते फॉर्मुला ई साठी खूप उत्सुक आहेत. महिंद्रा रेसिंग टीम यामध्ये सहभागी होत असल्याने एका स्थानिक टीमला पाठिंबा देण्याचा आनंद देखील चाहत्यांना मिळणार आहे. भारतातील प्रमुख तंत्रज्ञान केंद्र हैदराबाद या रेसिंगसाठी अतिशय योग्य ठिकाण ठरणार आहे. हायरपरफॉर्मन्स रेसिंग आणि अत्याधुनिक नवनवीन गोष्टींसाठीच नव्हे तर वातावरणातील बदलांच्या वाईट परिणामांबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी देखील हैदराबाद हे योग्य शहर आहे. वातावरणातील बदलांच्या समस्येवरील एक उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा विकास व स्वीकार महत्त्वाचा आहे ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील हैदराबादची निवड सार्थ ठरेल.”
एस नेक्स्ट जेनचे संस्थापक आणि ग्रीनकोचे सीईओ व एमडी अनिल कुमार चलमालशेट्टी यांनी सांगितले, “तेलंगणा सरकारसोबत भागीदारी आणि भारत सरकारच्या पाठिंब्यासह जगभरातील आवडीचा खेळ व भारतातील पहिल्या फॉर्मुला ई रेसचे आयोजन होत असल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. वातावरणातील बदलांना रोखण्यासाठी व जगभरात डिकार्बनायजेशनला प्रोत्साहन देण्यासाठीच्या तंत्रज्ञानांचा एक विश्वसनीय, टिकाऊ स्रोत म्हणून देशाला सक्षम बनवण्याच्या, माननीय पंतप्रधान मोदी जी यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करतो. एक हैद्राबादी म्हणून मला खूप आनंद होत आहे की, जगातील सर्वात हरित शहरांपैकी एक माझे शहर हैदराबाद, माननीय मंत्री के टी रामाराव यांच्या गतिशील नेतृत्वाखाली या हरित रेसचे यजमानपद भूषवणार आहे. पहिल्या नेट झीरो कार्बन रेसला आता फक्त १०० दिवस उरले आहेत. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू की भारत शाश्वत विकास आणि डिकार्बनायजेशनच्या भवितव्याचे नेतृत्व करत राहील.”
“वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड २०२२” पुरस्काराने सन्मानित शहर हैदराबाद, भारतातील सर्वात मोठे टेक हब बनण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये नावीन्यपूर्णतेवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित करते. फॉर्मुला ई सुरुवातीपासूनच जगातील एकमेव प्रमाणित नेट झीरो कार्बन खेळ आहे, आणि हैदराबाद ई- प्रिक्स ही भारतातील पहिली नेट झीरो मोटरस्पोर्ट चॅम्पियनशिप आहे. खेळाच्या माध्यमातून फॉर्मुला ई एक प्रभावी व सार्थक संदेश