मुक्तपीठ टीम
अमेरिकेत शिकण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. मात्र, अमेरिकन व्हिसा मिळवणे हे खूपच कठिण मानलं जातं. तरीही गेल्या २ महिन्यांमध्ये ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेत जाण्यासाठी शिक्षण व्हिसा मिळवला आहे. तेथे शिकायला जाणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही भारतीय विद्यार्थ्यांची आहे. कोरोनानंतर भारत हा जगातील इतर देशांच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतातील अमेरिकन दूतावासाचे सल्लागार मंत्री डॉ हेफ्लिन यांनी सांगितले की, अमेरिकेने २०२२ मध्ये ८२ हजाराहून अधिक विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत, हा एक विक्रम आहे. ते म्हणाले की, इतर देशांमध्ये कोरोनाशी संबंधित समस्या आल्यानंतर विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठवण्यात भारत इतर देशांच्या तुलनेत यंदा पहिल्या क्रमांकावर आहे.
मे-जूनमध्ये विक्रमी विद्यार्थी व्हिसा जारी
अमेरिकेच्या कामगिरीचे वर्णन करताना, नवी दिल्लीतील यूएस दूतावासातील सल्लागार व्यवहार मंत्री डॉन हेफ्लिन म्हणाले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्याच्या बाबतीत भारत हा अमेरिकेतील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. ते म्हणाले की भारतातील यूएस डिप्लोमॅटिक मिशनने मे आणि जून २०२२मध्ये विक्रमी ८२ हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले, जे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत.
भारताने विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठवण्यात गाठला मोठा टप्पा
- १. गेल्या वर्षी ६२ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा जारी करण्यात आला.
- २. मंत्री डॉन हेफ्लिन म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही सुमारे ६२ हजार विद्यार्थी व्हिसा जारी करण्याचा विक्रम केला. ३. विशेष म्हणजे या वर्षी जगातील इतर देशांमध्ये कोरोनाची समस्या असतानाही अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवणारा भारत पहिल्या क्रमांकाचा देश आहे.
डॉन हेफ्लिन म्हणाले की, यात काहीही बेकायदेशीर नाही, परंतु बनावट कागदपत्रे आणि खोट्या दाव्यांपासून दूर राहण्यास सांगितले. यात बेकायदेशीर काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले. स्लॉट बुक करण्यासाठी कोणत्याही एजंटची गरज नाही.
विद्यार्थी व्हिसा मिळवण्यासाठी फसवणूक कशी टाळावी?
- १. डॉन हेफ्लिन सल्ला देतात की तुम्ही चेक करत असाल तर, सिस्टममधून लॉक आऊट होण्यापासून वाचण्याचा मार्ग आहे तो म्हणजे याविषयी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
- २. लॉक आउट होऊ नये म्हणून तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन वेळा वेबसाइटला भेट दिली पाहिजे.
- ३. त्यांनी लोकांना साइटला दिवसातून दोन किंवा तीन वेळा भेट देण्याचा सल्ला दिला.
अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये २० टक्के भारतीय
- १. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये शिकणारे २० टक्के परदेशी विद्यार्थी भारतातील आहेत.
- २. यामध्ये २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात भारतातील १,६७,५८२ विद्यार्थी अमेरिकेत शिकत होते.