मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. आता रेल्वेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तक्रार करण्यासाठी कसलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. भारतीय रेल्वेने सुरुवातीपासून वापरण्यात येणाऱ्या सर्व हेल्पलाईन क्रमांकाच्या जागी ‘१३९’ क्रमांक जाहीर केला आहे. जेणेकरुन प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणे आणि रेल्वेशी संपर्क साधणे सोपे जाईल.
‘१३९’ क्रमांकाचा उपयोग
- प्रवाशांना १३९ या क्रमांकाचा उपयोग सर्व प्रकारची चौकशी किंवा तक्रारी नोंदविण्यासाठी करता येईल.
- प्रवासी केवळ सुरक्षा, तक्रारी नाही तर खानपान आणि दक्षतेसाठीही १३९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
- नवीन नंबर सुरू होताच इतर सर्व हेल्पलाईन क्रमांक बंद केले जातील.
मेसेजचीही सुविधा उपलब्ध
- प्रवाशांना १३९ हा क्रमांक विविध भाषांमध्ये उपलब्ध असेल.
- तो आयव्हीआरएस (इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) वर आधारित असेल.
- सर्व मोबाईल फोन वापरणारे १३९ वर कॉल करू शकतात.
- या क्रमांकावर, प्रवाशांना रेल्वेच्या संबंधीत आरक्षण, पीएनआर स्थिती, तिकिट उपलब्धता, रेल्वेची वेळ, आगमनाची आणि सुटण्याची वेळ अशा प्रकारची माहिती मेसेज पाठवूनही मिळू शकते.