मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वेने वंदे भारतनंतर आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. वजनाने हलकी आणि अधिक मालवाहतुकीची क्षमता असणाऱ्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अॅल्युमिनियम फ्राइट रॅकचा समावेश भारतीय रेल्वेने केला आहे. ओडिशातील भुवनेश्वर येथून या मालगाडीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. रेल्वेने सांगितले की, बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि अॅल्युमिनियम क्षेत्रातील प्रमुख हिंदाल्को यांच्या संयुक्त विद्यमाने उत्पादित वॅगनचे वजन कमी करण्यासाठी प्रति क्विंटल कार्बन फूटप्रिंट देखील कमी आहे.
स्वदेशी अॅल्युमिनियम फ्राइट रॅकची वैशिष्ट्ये…
- हा रेक पूर्वीपेक्षा हलका आहे परंतु माल वाहून नेण्याची क्षमता अधिक आहे.
- रेल्वेच्या मते, हा रॅक सध्याच्या स्टीलच्या रेकपेक्षा १८० टन हलका आहे, परिणामी त्याच अंतरासाठी वेग वाढतो, कमी वीज वापर होतो.
- हे पारंपारिक रॅकच्या तुलनेत प्रति ट्रिप १८० टन अतिरिक्त पेलोड वाहून नेऊ शकते.
- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रॅकला हिरवा झेंडा दाखवला.
India’s first aluminium freight rake #AatmanirbharBharat– single rake in its lifetime saves over 14,500 tonnes of CO2,
♻️ 85% recyclable,
💪180 ton extra carrying capacity,
Lighter weight, lower maintenance & longer life. pic.twitter.com/N1mJ0v4ZwY— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) October 16, 2022
कमी देखभाल खर्च
या रॅकचा देखभाल खर्च कमी असेल. रेल्वेने सांगितले की नवीन रॅकचे ८० टक्के पुनर्विक्री मूल्य आहे आणि ते सामान्य रेकपेक्षा १० वर्षे जास्त टिकते, तसेच, त्याची निर्मिती किंमत ३५ टक्के जास्त आहे कारण वरची रचना पूर्णपणे अॅल्युमिनियम आहे.
बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि हिंदाल्को यांच्या एकीकरणातून नवीन वॅगन तयार!
- मालवाहतूक रॅक बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि अॅल्युमिनियम क्षेत्रातील प्रमुख हिंदाल्को यांनी विकसित केले आहेत.
- हिंदाल्कोने सांगितले की, रेल्वे येत्या काही वर्षांत एक लाख वॅगन्स समाविष्ट करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन वार्षिक २.५ दशलक्ष टन कमी होईल.
- हिंदाल्कोच्या म्हणण्यानुसार, मालगाडीचा हा नवीन रेक एका वेळी १८० टन अधिक भार वाहून नेण्यास सक्षम असेल.
- या वॅगनच्या निर्मितीमध्ये कुठेही वेल्डिंगचा वापर करण्यात आलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
आठ ते दहा टन कार्बन उत्सर्जनात घट होईल
- या रॅकमुळे, त्याच्या सेवा कालावधीत ८ ते १० टन कार्बन उत्सर्जनात घट होईल, म्हणजेच केवळ एका रॅकच्या वॅगनमधून एकूण १४,५०० टन कार्बन उत्सर्जन कमी होईल.
- या गंज प्रतिरोधक वॅगन्स कमी ऊर्जा वापरतात परंतु त्यांची वहन क्षमता जास्त असते.
- या १००% पुनर्वापर करण्यायोग्य आहेत आणि या वॅगन ३० वर्षांनंतरही अबाधित राहतील.
- या वॅगन्समुळे हवामान उद्दिष्टे साध्य करता येतील.