Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानात कर्तव्य बजावताना शहीद!

July 16, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Danish Siddiqui

मुक्तपीठ टीम

अफगाणिस्तानातील हिंसाचारग्रस्त कंधारात एका हिंसक संघर्षात भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी शहीद झाले आहेत. अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंडजे यांनी शुक्रवारी अशी माहिती दिली की, गुरुवारी कंधार येथे भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकीची हत्या करण्यात आली. कंधारमधील अफगाण सुरक्षा दलासह प्रवास करताना ते कव्हरेज करत होते. वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी कार्यरत फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकी हे पुलित्झर पुरस्कार विजेता होते. यापूर्वी १३ जुलै रोजी ही दानिश प्रवास करत असलेल्या गाडीवर रॉकेट हल्ला झाला होता, पण त्यातून ते सुदैवाने बचावले होते.

 

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद ममुंडजे यांनी ट्वीट करत असे लिहिले की, “काल रात्री कंधार येथे दानिश सिद्दीकी यांच्या हत्येच्या दु:खद बातमीने मन अस्वस्थ झाले आहे. भारतीय पत्रकार आणि पुलित्झर पुरस्कार विजेता दानिश अफगाण सुरक्षा दलासह कव्हरेज करत होता. काबूलला जाण्यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वीच मी त्यांना भेटलो होतो. त्याचे कुटुंब आणि रॉयटर्स यांच्या दु:खात मी सहभागी आहे” असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

 

सिद्दीकी यांना अलीकडेच एका पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी अफगाण स्पेशल फोर्स मिशनवर बातमी दिली. त्यात पोलीस कसे आपल्या साथीदारांपासून विभक्त झाले आणि तरीही त्यांनी तालिबान्यांशी तासनतास लढा दिला हे वर्णन केले. दानिशने आपल्या कव्हरेजमध्ये अफगाण सैन्याच्या वाहनांना लक्ष्य करणार्‍या रॉकेटच्या छायाचित्रांनाही टिपले होते.

 

दानिश सिद्दीकी – टिव्ही रिपोर्टर ते फोटो जर्नालिस्ट

• दानिश सिद्दीकी हे करिअरच्या सुरुवातीला टीव्ही न्यूज रिपोर्टर होते.

 

• पण त्यांची पहिली आवड ही छायाचित्रण होती.

 

• त्यातही त्यांना जिथं मोठं, वेगळं घडतंय ते छायाचित्रांमधून मांडणं आवडायचं.

 

• त्यांच्या त्या आतील उर्मीनं त्यांनी छायाचित्रणाची वाट निवडली, ते फोटो जर्नलिस्ट झाले.

 

• दानिश सिद्दीकींचा कामाचा गौरव २०१८मध्ये जागतिक ख्यातीच्या पुलित्झर पुरस्काराने करण्यात आला.

 

• त्यांचे सहकारी अदनान आबिदींचाही सन्मान करण्यात आला होता.

 

• रोहिंग्या शरणार्थींवर दानिश सिद्दीकींनी केलेल्या कव्हरेजचीही प्रशंसा झाली होती.

 

• कोरोना हाताळणीत भारतातील लोक काय सहन करत आहेत, प्रशासन कसं अपूरं पडतंय, ते दाखवलं.

 

THREAD
Latest dispatch from the foothills of the Himalayas in India’s Uttarakhand.
We met Pramila Devi, the day she tested positive for COVID19. The doctor advised her husband to take her to a bigger hospital, but the cost was a deterrent. The couple returned home. @Reuters pic.twitter.com/I47jxuwuGN

— Danish Siddiqui (@dansiddiqui) May 27, 2021

• आणि विशेष म्हणजे एकाच स्मशानभूमीत किती प्रेतं जळतायत त्याचे गाजलेले टॉप अँगलवाले छायाचित्रही दानिश सिद्दीकी यांनीच काढलेले आहे.

हे नक्की वाचा:

 

As India posted world record of COVID cases funeral pyres of people, who died due to the coronavirus disease were pictured at a crematorium ground in New Delhi, April 22, 2021. @Reuters #CovidIndia pic.twitter.com/bm5Qx5SEOm

— Danish Siddiqui (@dansiddiqui) April 22, 2021

 

हेही वाचा: दानिश सिद्दीकींचं शहीद होण्यापूर्वीचं ट्वीट…गाडीवर रॉकेट धडकलं…मी बचावलो, पण ते टिपलं!

दानिश सिद्दीकींचं शहीद होण्यापूर्वीचं ट्वीट…गाडीवर रॉकेट धडकलं…मी बचावलो, पण ते टिपलं!


Tags: AfghanistanIndian photo journalistदानिश सिद्दीकी
Previous Post

“आमदारानं विधिमंडळात रिवॉल्व्हर उगारलं तर गुन्हा दाखल होणार नाही का?”

Next Post

दानिश सिद्दीकींचं शहीद होण्यापूर्वीचं ट्वीट…गाडीवर रॉकेट धडकलं…मी बचावलो, पण ते टिपलं!

Next Post
Danish Siddiqui

दानिश सिद्दीकींचं शहीद होण्यापूर्वीचं ट्वीट...गाडीवर रॉकेट धडकलं...मी बचावलो, पण ते टिपलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!