मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाने अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लिकेशन सेंटर (ISRO) सोबत करार केला आहे. हा करार समुद्रविज्ञान आणि हवामानशास्त्रातील उपग्रह आधारित नौदल प्रयोगातील डेटा आदानप्रदानासाठीचा सामंजस्य करार केला.
या उपक्रमामुळे, दोन्ही संस्थांना परस्पर सहकार्याचे एक समान व्यासपीठ मिळेल, ज्यामध्ये उपग्रह आधारित डेटाची पुनर्प्राप्ती आणि ऍप्लिकेशन्सच्या क्षेत्रात जलद विकास शक्य होईल. ज्यामुळे स्पेस ऍप्लिकेशन सेंटर द्वारे देशाच्या संरक्षणासाठी केलेली वैज्ञानिक प्रगती आणि भारतीय नौदलाच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधला जाईल. हा सामंजस्य करार २०१७ मध्ये स्वाक्षरी केलेल्या मागील सामंजस्य कराराचा पुढील भाग आहे, यामुळे दोन संस्थांमधील सहकार्य वाढीस लागेल.
सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रामध्ये गोपनीय नसलेल्या निरीक्षण डेटाची देवाणघेवाण, स्पेस ऍप्लिकेशन सेंटरमध्ये तयार झालेल्या हवामान विषयक उत्पादनांचे ऑपरेशन एक्सप्लॉयटेशन आणि नवीन साधनांच्या विकासासाठी उपग्रहाच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांची (SME) ची तरतूद, महासागर मॉडेलचे अंशांकन आणि प्रमाणीकरण यांचा समावेश आहे.
भविष्यात अर्थपूर्ण संवाद आणि व्यावसायिक देवाणघेवाण करण्यासाठी SAC आणि भारतीय नौदलाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.