मुक्तपीठ टीम
जगावर कोरोनाचे संकट कोसळल्यानंतर जगातील अनेक देशांच्या मदतीला आपला देश धावला. या मदतकार्याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदल वैद्यकीय आणि अन्य मदत साहित्य पोहचवण्यासाठी मिशन सागर राबवत आहे. मिशन सागरच्या अंतर्गत मे २०२० पासून भारतीय नौदलाने मदत कार्यास सुरुवात केली. हाती घेतलेल्या मोहमेचा एक भाग म्हणून, भारतीय नौदल जहाज केसरीने २५ डिसेंबर रोजी मोझांबिक येथील मापुटो बंदरात प्रवेश केला. या जहाजातून ५०० टन अन्नधान्य त्या देशातील जनतेसाठी पाठवण्यात आले.
आतापर्यंत भारतीय नौदलाच्या आयएनएस ऐरावतने थायलंडमध्ये ऑक्सिजन टॅकर पोहचवले. कोरोना संकटकाळातील मदतीसाठी आयएनएस केसरीने यापूर्वीही काम केले. मालदिव, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस आयलंड आणि सिसेल्स या देशांना ५५ दिवसांची मोहीम राबवत मदत पोहचवली. व्हिएटनामलाही ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता.
केसरी या जहाजांची तैनाती भारताचा विस्तारित सागरी शेजार आणि या विशेष संबंधांना भारताने दिलेले महत्त्व अधोरेखित करते.सध्या सुरु असलेल्या दुष्काळ आणि महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मोझांबिक सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने,आयएनएस केसरीच्या माध्यमातून अन्नाची ५०० टन मदत पाठवण्यात आली आहे. मोझांबिकच्या सशस्त्र दलांच्या क्षमता बांधणीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.यासाठी आयएनएस केसरीच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली दोन वेगवान इंटरसेप्टर विमाने आणि स्वसंरक्षण उपकरणे मोझांबिकच्या सशस्त्र दलांना सुपूर्द केली जातील.
आयएनएस केसरीने, लँडिंग शिप टँक (मोठे), मे – जून २०२० मध्ये मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मादागास्कर आणि कोमोरोस या देशांना मानवतावादी आणि वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यासाठी अशाच प्रकारचे अभियान हाती घेतले होते, या अभियानाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भारतीय नौदलाच्या वैद्यकीय सहाय्य पथकांच्या तैनातीचा समावेश होता.
मे २०२० पासून, भारतीय नौदलाने सागर मोहिमांतर्गत १५ मित्र राष्ट्रांमध्ये जहाजे तैनात केली आहेत. समुद्रात २१५ दिवसांपर्यंत असलेल्या या जहाजांच्या तैनातींमुळे एकूण ३,००० मेट्रिक टन पेक्षा जास्त अन्न सहाय्य, ३०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन, ९०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि २० आयएसओ कंटेनर्सची मदत दिली आहे.या मोहिमा हाती घेत असताना, भारतीय नौदलाच्या जहाजांनी 40,४०,०० एनएम इतके एकूण अंतर पार केले आहे जे पृथ्वीच्या परिघाच्या जवळपास दुप्पट आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवतावादी सहाय्य वेळेत पोहोचवण्याच्या दृढ हेतूने, भारतीय नौदलाच्या जहाजे आणि किनारी संघटनांच्या कर्मचार्यांनी आपल्या मित्र राष्ट्रांना मदत पोहोचवण्यासाठी सुमारे दहा लाख तास काम केले आहे.