मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाला आता आतंरराष्ट्रीय सन्मान वाढत चाललाय. नुकताच आपल्या नौदलाच्या युद्धनौकेनं युरोपातील इटलीच्या नौदलासोबत संयुक्त सराव केला. भूमध्य सागरात सध्या तैनात असलेल्या आयएनएस तबरने इटलीच्या नेपल्स बंदरात प्रवेश केला. इटालियन नेव्हीकडून या जहाजाचे जोरदार स्वागत करण्यात आले. बंदरातील मुक्कामादरम्यान, कमांडिंग ऑफिसर कॅप्टन महेश मांगीपुडी यांनी प्रीफेक्ट ऑफ नेपल्स अथॉरिटी, जनल इटालियन नेव्हल हेडक्वार्टर आणि कोस्टगार्ड हेडक्वार्टर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
बंदरातून निघताना या जहाजाने आयटीएस अँटोनियो मार्सेग्लिया यांच्यासह टायरेनेयनियन समुद्रात दोन दिवस समुद्री भागीदारीत सरावही केला. या सरावांमध्ये हवाई संरक्षण प्रक्रिया, समुद्रावरील संप्रेषण कवायती, आणि दिवसा आणि रात्री होणाऱ्या क्रॉस डेक हेलो ऑपरेशन्सचा समावेश होता. नौदल सरावाची परस्पर कार्यक्षमता वाढविण्यासाठी, सागरी धोक्यांविरुद्ध एकत्रित काम करण्यासाठी हा अशा प्रकारचा सराव दोघांनाही फायदेशीर होईल.
नौदलाच्या प्रथेनुसार या जहाजांच्या सरावाचा शेवट दोन्ही जहाजांच्या ‘स्टीम पास’ने केला.