मुक्तपीठ टीम
इंधन उद्योगात महत्वाचा असणारा रिअॅक्टर लार्सन अँड ट्युब्रो या भारतीय कंपनीनं वेळेआधीच बनवण्याची कमाल केलीय. सर्वात महत्वाचं म्हणजे हा रिअॅक्टर जगात सर्वात मोठा आहे.
अभियांत्रिकी विश्वासात आपल्या कर्तबगारीनं नित्य नवे झेंडे फडकवणाऱ्या लार्सन अँड ट्युब्रो म्हणजेच एल अँड टी कंपनीचे चौफेर कौतुक होत आहे. कंपनीने जगातील सर्वात मोठा अवजड एलसी-मॅक्स रिअॅक्टर नुकताच पूर्ण केला.
२ हजार ३१३ मेट्रिक टन वजन असणारा हा रिअॅक्टर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या विशाखापट्टणम रिफायनरीत बसवला जाईल. या रिअॅक्टरमुळे सर्वात जड कच्च्या तेलाला उच्च दर्जाच्या डिझेलमध्ये शुद्ध करु शकेल. हाजिरामधील एल अँड टीच्या उत्पादन प्रकल्पामधून हा रिअॅक्टर एकसंध अशा विशाखापट्टणमला पाठवला जात आहे.
हा रिअॅक्टर रवाना करताना हिंदुस्तान पेट्रोलियमचे चेअरमन एम के सुवर्णा, संचालक विनोद शेणॉय, एल अँड टीचे सीईओ एस एन सुब्रह्मण्यन, उपाध्यक्ष अनिल परब उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ: