मुक्तपीठ टीम
चांगली कम्युनिकेशन सिस्टम म्हणजेच संवाद यंत्रणा सर्व लष्करी मोहिमांसाठी आवश्यक आणि निर्णायक आहे. आता भारतीय लष्कराला लवकरच लष्करासाठी गोंगाटातही उपयोगी ठरणारी ‘भारतीय’ बनावटीची कम्युनिकेशन सिस्टम तयार करण्यात येत आहे. ही सिस्टम लष्करासाठी गेमचेंजर ठरेल अशी अपेक्षा आहे.
युद्धभूमीवर भारतीय लष्करासाठी कॉम्बॅट नेट रेडिओ म्हणजेच सीएनआर संवादासाठीचा मुख्य आधार आहे. भारतीय लष्करातील समकालीन सीएनआर उपकरणे केवळ आवाजाद्वारे संवादाला मदत करतात आणि त्यात मर्यादित क्षमता आहे किंवा कोणतीही माहिती प्रसारण क्षमता नाही. युद्धभूमीवर जवानांना युद्धासाठी सुसज्ज करण्यासाठी सध्याचे रेडिओ लवकरच बदलले जाणार आहेत. त्यांना त्याजागी स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर डिफाइण्ड रेडिओ दिले जातील. नव्या रेडिओंमध्ये अधिक माहिती प्रसारण क्षमता आणि आवाजाची स्पष्टता मिळेल. त्याचवेळी अत्यंत गोंगाट असलेल्या वातावरणातही माहिती प्रसारणात अचूकता असेल
१. मेक – II श्रेणी अंतर्गत अति / अल्ट्रा उच्च लहरी (व्ही / यूएचएफ) मॅनपॅक एसडीआर खरेदी करून भारतीय लष्कराचे संवाद यंत्रणेत सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.
२. हे सुधारणा घडवण्याचे काम १८ भारतीय विक्रेत्यांना देण्यात आले आहे.
३. संरक्षण संपादन प्रक्रियेच्या भारतीय-आयडीडीएम खरेदी श्रेणीतील तरतुदीनुसार , उत्पादन यशस्वी विकसित करणाऱ्या कंपनीला कंत्राट दिले जाईल.
४. मेक -II अंतर्गत विकसित केलेला व्ही / यूएचएफ मॅनपॅक एसडीआर भारतीय लष्करासाठी गेमचेंजर ठरेल.
५. हे सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” धोरणाशी सुसंगत आहे.ज्यामुळे विकसित संवाद प्रणालीमध्ये ‘आत्मनिर्भरता’ येईल.
पाहा व्हिडीओ: