मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर टीका केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय बार असोसिएशनने (indian bar association) राऊतांच्या विरोधात अवमान याचिक दाखल केली आहे. ‘न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय.महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला होता.
राऊतांविरोधात जनहित याचिका दाखल…
- इंडियन बार असोसिएशनने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतरांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे.
- उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींविरोधात खोटे, (प्रतिष्ठेला) कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी” ही याचिका दाखल करण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
- अर्जदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा याचिकेमध्ये प्रतिसादकर्ते म्हणून उल्लेख केलाय.
राऊत काय म्हणाले होते?
- एखाद्या विशिष्ट पक्षाच्या आणि विचारसणीच्या लोकांना न्यायालयाकडून रांगेत दिलासे कसे मिळतात असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता.
- संजय राऊत यांना पत्रकारांनी १५ एप्रिल रोजी संवाद साधताना सोमय्यांसंदर्भात प्रश्न विचारला होता.
- त्यावर उत्तर देताना राऊत यांनी हे वक्तव्य केलं होतं.
- तसेच न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेली आहेत का? दिलासे देण्यासाठी ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का?
- हे असच सुरु राहिलं तर या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल,” असेही राऊत म्हणाले होते.