मुक्तपीठ टीम
प्रत्येक व्यक्तीला जीवनात काहीतरी करण्याची इच्छा, महत्त्वकांक्षा मनात असते. यासाठी परिश्रम आणि मेहनतीची जर जोड मिळाली तर सर्व काही शक्य आहे. अशीच एक कामगिरी करत नरवणाच्या धमतन साहिब गावातील मंजू नैन यांनी हा मुद्दा सार्थ ठरवला आहे. १० हजार फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून तिने असा पराक्रम करून दाखवला आहे. लष्करात लान्स नाईक म्हणून गुवाहाटी येथे तैनात मंजू नैन लहानपणापासूनच धाडसी आहे. ती एवढं धाडसी पाऊल उचलेल असं तिच्या आई-वडिलांना आणि गावातील लोकांनाही वाटलं नव्हतं.
धााडसी मंजूचं बालपण आणि कामगिरी
- मंजू नैनचे वडील हरिकेश आणि आई संतोष यांनी सांगितले की, मंजू नैन लहानपणापासूनच धैर्यवान मुलगी आहे.
- तिचा मोठा भाऊ दलबारा कबड्डी खेळायचा, त्यामुळे तीही त्याच्यासोबत कबड्डी खेळायला जायची.
- ती दररोज १० किमी धावत असे. त्यामुळे ती कबड्डी खेळात पारंगत झाली आणि तिने शालेय क्रीडा स्पर्धेत अनेक पदके मिळवली.
- गावातील सरस्वती वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातून दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने निदानी गावात असलेल्या भाई सुरेंद्र सिंग मेमोरियल स्पोर्ट्स स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
- जिथे तिने कबड्डी खेळातील बारकावे शिकले आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेऊन पदके जिंकली.
- तिने सांगितले की, वयाच्या १७व्या वर्षी अंबाला येथील इस्टर्न कमांडमध्ये आर्मी पोलिसांसाठी महिलांच्या पहिल्या भरतीमध्ये भाग घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली आणि सैन्यात दाखल झाली.
- तेथेही तिला सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून गौरविण्यात आले.
मंजू नैनचे वडील हरिकेश यांनी सांगितले की, “प्रशिक्षणादरम्यान तिला १० हजार फूट उंचीवरून हेलिकॉप्टरमधून कोणाला स्कायडायव्हिंग करायचे आहे, असे विचारले होते. त्यावर मंजू नैनने एकटीने हात वर केला. ज्यावर सर्वांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. स्कायडायव्हिंगच्या तयारीसाठी मंजू नैनला बंगळुरूमध्ये एक वर्ष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मंजू नैन कधीही घाबरली नाही. तिच्या वडिलांनी सांगितले की, मंजूला स्कायडायव्हिंगपूर्वी कोणतीही चिंता नव्हती. त्यामुळेच ती एवढं धाडसी पाऊल उचलू शकली.”
आर्थिक परिस्थितीमुळे लष्कर पोलीसात जाण्याचा मंजूचा निर्णय!
- कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी मंजू लष्कर पोलीसात गेली.
- मंजू नैनचे वडील शेती करतात आणि शेती करून ते संपूर्ण घर चालवत असे. हे सर्व मंजू लहानपणापासून पाहत होती.
- त्यामुळेच कबड्डी या खेळातून तिला आपल्या घरची परिस्थिती सुधारायची होती.
- जिथे वैद्यकीय क्रीडा प्रशिक्षणादरम्यान, वयाच्या १७या वर्षी तिने अभ्यासादरम्यान महिलांच्या पहिल्या भरतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.
- तिने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि तिची निवडही झाली.
- मंजू नैन या तीन वर्षांच्या सेवेत एकदाही घरी आली नाही.
मंजूला आता आर्मी पोलीसात मोठ्या पदावर जाऊन देशसेवा करायची आहे, असे तिने सांगितले. स्कायडायव्हिंग केल्याने नोकरीत प्रमोशन मिळेल असा फायदा मिळणार असल्याचे तिने सांगितले. मंजू नैनच्या या कृतीमुळे तिला देशाच्या शौर्य पुरस्काराने नक्कीच सन्मानित केले जाऊ शकते.