मुक्तपीठ टीम
भारतीय वायुसेनेची ताकद आता आणखी वाढणार आहे. पुढील महिन्यात आणखी १० राफेल विमान भारतात पोहोचतील. यामुळे भारताकडे राफेलची संख्या २१ होईल. सध्या भारताकडे ११ राफेल लढाऊ विमान आहेत. ते अंबालाच्या १७ स्क्वॉड्रनच्या वैमानिकांसह उड्डाण करत आहेत.
येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भारताला ३ राफेल विमान मिळू शकतात तर एप्रिलच्या उत्तरार्धात सात ते आठ लढाऊ विमानं येतील. याशिवाय राफेलचा ट्रेनर व्हर्जनही भारतात येणार आहे. हे सर्व फ्रान्समधून थेट भारतात येतील, त्यांना मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांच्या मदतीने एअर-टू-एअर रीफ्यूलिंगद्वारे पोहोचवण्यात येईल.
२०१६ मध्ये भारताने फ्रान्सबरोबर ५८ हजार कोटी रुपयांमध्ये ३६ राफेल विमानांचा करार केला होता. यामध्ये ३० लढाऊ विमान आणि ६ प्रशिक्षण विमाने असतील. ट्रेनर जेट टू सिटर असतील आणि त्यात लढाऊ जेट सारख्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असेल. भारताला जुलैच्या अंतिम टप्प्यात ५ राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच मिळाली. २७ जुलै रोजी ७ भारतीय वैमानिक फ्रान्समधून राफेलसह रवाना झाले आणि २९ जुलै रोजी ७,००० किमीचा प्रवास करून भारतात पोहोचले. यानंतर ४ नोव्हेंबर २०२० रोजी ३ राफेल लढाऊ विमानांची दुसरी बॅच आली. यानंतर, तिसर्या बॅच अंतर्गत, २७ जानेवारी रोजी ३ राफेल लढाऊ विमान भारतात आले. या विमानांच्या सहाय्याने आतापर्यंत ११ राफेल विमानांचा वायू सेनेच्या ताफ्यात समावेश झाला आहे.
पाहा व्हिडीओ: