मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या प्रादुर्भावाने जगभरात महामारी पसरलेली आहे. आर्थिक संकट निर्माण झाले आहे. तरीही २०३० पर्यंत भारत आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटन आणि जर्मनीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा दावा आयएचएस मार्किटने जारी केलेल्या अहवालात केला आहे.
आयएचएस मार्केटच्या मते, भारताचा जीडीपी सध्या अमेरिका, चीन, जपान, जर्मन आणि ब्रिटननंतर सहाव्या क्रमांकावर आहे. मूल्याच्या दृष्टीने, २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २७ अब्ज होता, जो २०३० पर्यंत ८४ अब्जापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ही वाढ जपानला मागे टाकण्यासाठी पुरेशी आहे, ज्यामुळे भारत २०३० पर्यंत आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
भारताचा विकास दर २०२१-२२ मध्ये ८.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर मागील आर्थिक वर्षात ७.३ टक्के घट झाली होती. तसेच, चालू आर्थिक वर्षातील गती २०२२-२३ मध्येही कायम राहील आणि भारत ६.७ टक्के विकास साधेल.
भारताचा विकास दर वाढवण्यात ई-कॉमर्स क्षेत्रासह उत्पादन, पायाभूत सुविधा आणि सेवा क्षेत्राची मोठी भूमिका आहे. इतकेच नाही तर वाढत्या डिजिटलायझेशनमुळे आगामी काळात ई-कॉमर्स मार्केट मोठे होणार आहे. एका अहवालानुसार २०३० पर्यंत १.१ अब्ज भारतीयांकडे इंटरनेट असेल, २०२० मध्ये ही संख्या ५०० दशलक्ष होती.
येत्या १० वर्षात भारताचा विकास दर सर्वात जास्त असणार
- आयएचएस मार्किटने असा दावा केला आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेचे एकंदरीत भवितव्य भक्कम आणि स्थिर दिसत आहे.
- यामुळे पुढील १० वर्षात भारत सर्वात वेगाने वाढणाऱ्या जीडीपीचा देश बनूण राहील.
- दीर्घकाळात, पायाभूत सुविधा क्षेत्र आणि स्टार्टअप्स सारखा तांत्रिक विकास भारताचा वेगवान विकास दर टिकवून ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतील.
भारताला सर्वात जास्त मदत त्याच्या मोठ्या प्रमाणातील मध्यमवर्गाकडून मिळते, जी त्याची मुख्य ग्राहक शक्ती आहे. पुढील येत्या १० वर्षात भारतीय ग्राहकांचा खर्चही दुप्पट होईल, असा अंदाज आयएचएस मार्किटने वर्तवला आहे. हे २०२० मध्ये १५ अब्ज वरून २०३० मध्ये ३० अब्जपर्यंत वाढू शकते.