मुक्तपीठ टीम
आरा योद्धा, बनारसी वॉरियर्स, बारबती बेकन्स, ग्रीन गार्डियन्स ऑफ गांधीनगर, नवी मुंबई ईसीओ नाईट्स, चंदीगड चॅलेंजर्स, इनक्रेडिबल स्वच्छ इंदोरिज हे क्रीडा संघ नाहीत, तर हे आहेत ते संघ ज्यांना लाखो उत्साही तरुणांनी भारतीय स्वच्छता लीगमध्ये सहभागी होण्यासाठी तयार केले आहेत. हे संघ त्यांच्या शहरांना कचरामुक्त ठेवण्यासाठी एक मोठी मोहीम राबवतील.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) अंतर्गत, भारतीय स्वच्छता लीगचे आयोजन १७ सप्टेंबर २०२२ रोजी केले जात आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय स्वच्छता लीग आयोजित करण्याचे घोषित केले होते. भारतीय स्वच्छता लीगमध्ये सहभागी होण्यासाठी १८०० पेक्षा जास्त शहरांनी नोंदणी केली आहे. दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४७ शहरांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांच्या (ULBs) टक्केवारीवर आधारित आकडेवारीनुसार जास्तीत जास्त सहभाग असलेली शीर्षस्थानावरील तीन राज्ये आहेत ओडिशा-१००%, आसाम-९९% आणि छत्तीसगड-९७%.
तरुणांच्या नेतृत्वाखालील या अनोख्या स्पर्धेत काही नामांकित व्यक्ती सहभागी होताना दिसतील ज्यामध्ये क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर इनक्रेडिबल इंदोरिससाठी फलंदाजी करताना, प्रख्यात गायक आणि पद्म पुरस्कार विजेते शंकर महादेवन नवी मुंबई ईसीओ नाइट्सकडून खेळताना, खासदार आणि अभिनेत्री किरण खेर, गायक बी प्राक, ऑलिम्पिक स्पर्धेतला सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा चंदीगड चॅलेंजर्स ला पाठिंबा देताना दिसतील. तसेच या व्यक्ती स्वच्छ समुद्रकिनारे, टेकड्या आणि पर्यटन स्थळांसाठी काढण्यात येणाऱ्या रॅलीतही सहभागी होतील. स्थानिक राजकीय प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित व्यक्ती, मंत्री, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, ब्रँड ॲम्बेसिडर हे देखील सहभागी होऊन विविध उपक्रमांना झेंडा दाखवतील आणि या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न करतील. चंदीगडचे नगरसेवक महेशिंदर सिंग सिद्धू, तिरुपतीचे महापौर बीआर सिरिषा, तिरुपतीच्या आयुक्त अनुपमा अंजली, तिरुपतीचे आमदार भूमना करुणाकर रेड्डी, इंदूरचे महापौर, आयएमसी पुष्यमित्र भार्गव या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
शहरातील विविध संघ स्मारके, पर्यटन स्थळे आणि समुद्रकिनाऱ्यांजवळील ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी स्पर्धा करतील. विष्णुपद, सीताकुंड, गया येथील अक्षयवती, आग्रामधील ताजगंज, अयोध्येतील नयाघाट, फतेहपूर सिक्रीमधील बुलंद दरवाजा, लखनौमधील लालबाग, वाराणसीतील अस्सी घाट, साबरमती नदीच्या समोरील अटल पूल, गांधी आश्रम, गांधी आश्रम, सरदार पटेल पुतळा, गुजरातमधील गोमती नदी, कफ परेड, वरळीचा किल्ला, बृहन्मुंबईतील जुहू पट्टी, इंदूरमधील मेघदूत गार्डन, लोणावळ्यातील खंडाळा तलाव यासारख्या अनेक स्थळांचा यात समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील संकेतस्थळावर नोंदणी करावी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/17 सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही नोंदणी करता येईल.