इटलीतील पियाजिओ कंपनी एप्रिलिया एसएक्सआर १६० मॅक्सी ही नवीन प्रीमियम स्कूटर लाँच करणार आहे. भारतातील तरुण खरेदीदारांना लक्ष्य करण्यासाठी ही स्कुरटर येणार आहे. २०२०च्या ऑटो एक्सपोमध्ये ही स्कुटर सादरही केली गेली होती. एप्रिलिया एसएक्सआर १६० मॅक्सी स्कूटरसाठी नोंदणी सुरु झाली आहे. या नव्या स्कूटरचं उत्पादन पुण्यातील बारामती प्लांटमध्ये सुरू झालं आहे. ज्यांना ती स्कूटर खरेदी करायची आहे ते थेट ऑनलाईन किंवा अधिकृत डीलरद्वारे ५ हजार रुपये अधिकृत रक्कम देऊन बुक करू शकतात.
१. एप्रिलिया एसएक्सआर १६० प्रथम २०२० ऑटो एक्सपोमध्ये मॅक्सी संकल्पना म्हणून सादर केली गेली. ही नवीन स्कूटर इटलीमध्ये तयार केली गेली आहे. यात ड्युअल हेडलॅम्प्स आणि डेटाइम रनिंग लॅम्प आहेत.
२. माहितीनुसार कंपनी मायलेज इंडिकेटर आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देखील वापरणार आहे. स्कूटरमध्ये चार्जर आणि लिट-अप अंडरसाइट स्टोरेज असलेले स्प्लिट ग्लोव्ह बॉक्स देखील असणे अपेक्षित आहे.
३. एप्रिलिया एसएक्सआर १६० मध्ये बीएस ६ कंप्लेंट १६० सीसी, सिंगल-सिलिंडर इंजिन दिले जाईल. जे एसआर १६० ला शक्ती देखील देते. हे इंजिन १०.७ बीएचपी उर्जा आणि ११.६ एनएम पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.
४. कंपनीने आधीच घोषणा केली आहे की नवीन एप्रिलिया एसएक्सआर १६० लवकरच भारतात येईल. हे स्कूटर जानेवारी २०२० मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्याची किंमत १ लाखांपासून सुरू होऊ शकते.