मुक्तपीठ टीम
भारतात आता एकप्रकारे डिजिटलीही स्वायत्त होत आहे. सध्याच्या राजकीय भाषेत बोलायचं तर आत्मनिर्भर होऊ लागलाय. भारतात स्थानिक पातळीवर निर्मिती झालेले रूट सर्व्हर बसवण्याची क्षमता आहे. ज्यांची किंमत १० कोटींपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारताकडे आता स्वतःचे सुरक्षित इंटरनेट तयार करण्याची क्षमता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयटीआय आणि उद्योग क्षेत्रातील आयपीव्ही ६ फोरमने ही माहिती दिली आहे.
सन २०१० आणि २०१२ मध्ये दूरसंचार विभागाने आयपीव्ही ६ वेब अॅड्रेसची पहिली व दुसरी रुपरेषा जारी केली होती. याद्वारे अनेक हजार अब्ज विशिष्ट वेब अॅड्रेस दिले जाऊ शकतात. जुन्या आयपीव्ही ४ सिस्टम अंतर्गत तीन अब्ज आयपी अॅड्रेसची मर्यादा होती.
आयपीव्ही ६ची २००६मध्ये सुरुवात झाली. अखेर भारताने आयपीव्ही ६ची रुपरेषा जाहीर केली. आयपीव्ही ६ अॅड्रेसमध्ये आता भारताचा ५० टक्के वाटा आहे. त्याचा विचार केला तर याबाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आहे.
पाहा व्हिडीओ: