मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सच्या पार गेला आहे. अलीकडे, परकीय भांडवलाची आवक खूप वेगाने वाढली आहे, ज्यामुळे परकीय चलन साठ्यातील आकडेवारी वाढत आहे.
रिझर्व्ह बँकेने २८ मे रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा २.८६५ अब्ज डॉलर्सने वाढून ५९२.८२४ अब्ज डॉलरवर पोचला आहे. सोन्याचा साठा आणि परकीय चलन मालमत्ता वाढल्यामुळे चलन साठा वाढला आहे.
शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणाचा आढावा घेताना दास म्हणाले की, सध्याच्या अंदाजांच्या आधारे, आम्हाला विश्वास आहे की परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्सच्या पार गेला आहे.
अर्थव्यवस्थेत रोख प्रवाही राहण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अनेक प्रोत्साहक पावलं उचलली आहेत. रिझर्व्ह बँकेने गव्हर्नमेंट सिक्युरिटीज पर्चेस प्रोग्राम (जी-एसएपी) २.० जाहीर केली. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत रिझर्व्ह बँक दुय्यम बाजारपेठेतून १.२० लाख कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीज खरेदी करेल.
त्याचबरोबर रिझर्व्ह बँक १७ जून रोजी ४०,००० कोटी रुपयांची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करेल.