Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

लाल किल्ल्यावर कसा साजरा झाला देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन?

August 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
red fort

मुक्तपीठ टीम

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देश ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे. संपूर्ण देशात, देशभक्तीचे चैतन्यमयी वातावरण आहे. भारत सरकारच्या विविध मंत्रालयांद्वारे तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह, सैन्यदले आणि जनताही देशभरात, गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक प्रसंगानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत. आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरुन मुख्य सोहळा संपन्न झाला आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झाले आणि त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले.

 

पंतप्रधानांनी यावर्षी मार्च मध्ये, गुजरातमधील साबरमती आश्रमातून ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अभियानाची’ सुरुवात केली होती. हा उत्सव १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे.

Independence day

लालाकिल्ल्यावर आगमनानंतर पंतप्रधानांना मानवंदना

  • सकाळी पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग,संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे औपचारिक स्वागत केले. त्यानंतर, संरक्षण सचिव पंतप्रधानांना दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, AVSM यांचा परिचय करुन देण्यात आला.
  • त्यानंतर, जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधानांना सलामी तळाकडे घेऊन गेले.
  • या ठिकाणी तिन्ही सैन्यदल प्रमुख आणि दिल्ली पोलीस गार्ड यांनी पंतप्रधानांना सलामी दिली. यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवंदना स्वीकारली.
  • पंतप्रधानांना मानवंदना देणाऱ्या पथकात, लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलीस यांचा प्रत्येकी एक अधिकारी आणि २० जवान होते.
  • यावर्षी भारतीय नौदल समन्वय सेवा म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
  • मानवंदना पथकाची कमान कमांडर पीयूष गौर यांच्याकडे होती.
  • पंतप्रधानांच्या नौदल मानवंदना पथकाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर सुने फोगट यांनी केले.
  • लष्कराच्या पथकाचे नेतृत्व मेजर विकास संगवान करत होते.
  • हवाई दल तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर ए बेरवाल यांनी केले.
  • दिल्ली पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस उप महासंचालक (पश्चिम जिल्हा) सुबोध कुमार गोस्वामी यांनी केले.

 

पंतप्रधानांचे लालकिल्ल्यावर आगमन

  • मानवंदना स्वीकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याकडे प्रस्थान केले.
  • तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत,लष्कर प्रमुख एम एम नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया यांनी त्यांचे स्वागत केले.
  • दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्याच्या बुरुजावरील व्यासपीठापर्यंत घेऊन गेले.

Independence day

राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी

  • ध्वजारोहण झाल्यानंतर, राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामी दिली जाईल.
  • ध्वजारोहण आणि सलामीच्या वेळी नौदलाच्या १६ जवानांच्या पथकाने राष्ट्रगीत धून वाजवली. या बॅन्ड पथकाचे नेतृत्व एमसीपीओ व्हीनसेंट जॉन्सन यांनी केले.
  • लेफ्टनंट कमांडर पी प्रियंवदा साहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रध्वज फडकवतांना सहाय्य केले.
  • त्याचवेळी, एलिट २२३३ फील्ड बॅटरी पथकाच्या बंदूकधारींनी बंदुकीच्या २१ फैरी झाडून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
  • लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंग मेहता, एस एम, यांनी पथकाचे नेतृत्व केले आणि नायब सुभेदार अनिल चंद गन पोझिशन ऑफिसर होते.
  • राष्ट्रध्वज मानवंदना पथकात, पाच अधिकारी आणि तिन्ही सैन्यदले व दिल्ली पोलिसांचे १३० जवान होते.

 

राष्ट्रध्वज मानवंदना पथकाचे नेतृत्व नौदल कमांडर कुलदीप एम नेरळकरांकडे!

  • राष्ट्रध्वज मानवंदना पथक ध्वजारोहण सुरु असतांना राष्ट्रध्वजाला सलामी देत होते.
  • या पथकाचे नेतृत्व भारतीय नौदलाचे कमांडर कुलदीप एम नेरळकर यांनी केले.
  • राष्ट्रध्वज मानवंदना पथकात नौदल तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर प्रवीण सारस्वत यांनी केले.
  • लष्कराच्या तुकडीची जबाबदारी, मेजर अंशूल कुमार यांच्याकडे होते.
  • हवाई दल तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर रोहित मालिक यांच्याकडे होते.
  • दिल्ली पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस उपायुक्त (दक्षिण-पश्चिम जिल्हा) अमित गोयल यांच्याकडे होते.

 

लालकिल्ल्यावर ऑलिंपिक खेळाडूही!

  • या कार्यक्रमात, सुवर्णपदक विजेता भालाफेक पटू नीरज चोप्रा सह ३२ ऑलिंपिक विजेते खेळाडूदेखील सहभागी झाले.
  • त्याशिवाय, साई- म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे दोन अधिकाऱ्यांनाही या सोहळ्यात विशेष आमंत्रण देण्यात आले होते.
  • तसेच इतर २४० ऑलिंपिक खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि साईचे अधिकारी यांना लाल किल्ल्यासमोरच्या ज्ञान पथाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रणाचा मान देण्यात आला होता.
  • भारतीय खेळांडूनी यंदाच्या टोकियो ऑलिंपिकमध्ये आजवरची सर्वोत्तम, कामगिरी करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.

Independence day

कोरोना योध्यांसाठी वेगळी आसनव्यवस्था

  • कोरोनाविरोधातल्या लढ्यात, ज्यांनी आघाडीवर राहून या अदृश्य शत्रूशी लढा दिला, अशा सर्व कोरोना योध्यांसाठी यावेळी किल्याच्या दक्षिण भागात वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली होती.

पहिल्यांदाच सोहळ्यावर आकाशातून पुष्पवृष्टी

  • यावर्षी पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, या संपूर्ण स्थळावर हवाई दलाच्या Mi 17 1 V हेलिकॉप्टरने, अमृत आकारात पुष्पवृष्टी केली गेली.
  • पहिल्या हेलिकॉप्टरचे कॅप्टन विंग कमांडर बलदेव सिंग बिश्त, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरची धुरा विंग कमांडर निखिल मेहरोत्रा यांच्याकडे होते.
  • पुष्पवृष्टी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केले.
  • राष्ट्राला उद्देशून भाषण संपल्यानंतर, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्सनी राष्ट्रगीत गायले.
  • विविध शाळांमधील एनसीसीचे ५०० कॅडेट्स (लष्कर, नौदल आणि हवाई दल) या कार्यक्रमात सहभागी होतील.

Tags: Defense Minister Rajnath SinghgujratIndian ArmyIndian Navyprime minister narendra modired fortTokyo Olympicsटोकियो ऑलिंपिकपंतप्रधान नरेंद्र मोदीभारतीय नौदलभारतीय हवाई दलसंरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट
Previous Post

“मुलींच्या यशात भविष्यातल्या विकसित भारताची झलक दिसते”

Next Post

अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

Next Post
Shaurya Medal

अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी सेवा कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!