मुक्तपीठ टीम
पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा भडका होत असताना रस्त्यांवरून प्रवास करणे महाग झाले असतानाच आता देशांतर्गत विमान प्रवासही महागत आहे. केंद्र सरकारने किमान हवाई भाडे १३ टक्क्यांवरुन १६ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, उच्च स्तरावरील भाडे स्तरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नागरी उड्डान मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. एक जून २०२१ पासून हे नवीन भाडे लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.
विमान कंपन्याना दिलासा
• कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्या लाटेत विमान प्रवासावर बंदी होती.
• कोरोनाचा प्रभाव कमी होताच सरकराने विमान प्रवासाला मंजूरी दिली.
• मात्र, सरकारने पूर्ण क्षमतेने विमान प्रवासाला मान्यता दिलेली नाही.
• कमाल आणि किमान भाड्यांवरही मर्यादा घातली होती.
• तर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यामुळे विमान कंपन्यावरील ओझे वाढले आहे.
• अशा परिस्थितीत किमान भाड्यात वाढ केल्यास विमान कंपन्यांवरील आर्थिक ओझे कमी करण्यास मदत होईल.
नागरी उड्डाण मंत्रालयानं कसं वाढवलं भाडं?
• नागरी उड्डान मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.
• आता ४० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठी किमान २६०० रुपये खर्च होणार आहे.
• आतापर्यंत ४० मिनिटांच्या प्रवासासाठी २३०० रुपये होते त्यात ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
• तसेच १८० ते २१० मिनिटांच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी किमान भाडे ११०० रुपयांनी वाढविण्यात आले आहे.
• प्रवाशांचे ७६०० रुपयांऐवजी ८७०० रुपये खर्च होणार आहेत.
• याआधी फेब्रुवारी महिन्यात सरकारने विमान भाड्यातील प्राइस बँडमध्ये १०-३० टक्क्यांनी वाढ केली होती.
दरवाढीनंतर कसं असणार नवीन भाडे?
• ४० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठी २६०० ते ७८०० रुपये
• ४०-६० मिनिटांच्या प्रवासासाठी ३३०० ते ९८०० रुपये
• ६० ते ९० मिनिटांच्या प्रवासासाठी ४००० ते ११७०० रुपये
• ९०-ते १ तास १ मिनिटांच्या प्रवासासाठी ४७०० ते १३००० रुपये
• १२०-१५० मिनिटांच्या प्रवासासाठी ६१०० ते १६९०० रुपये
• १५० ते १८० मिनिटांच्या प्रवासासाठी ७४०० ते २०४०० रुपये
• १८० ते २१० मिनिटांच्या प्रवासासाठी ८७०० ते २४०० रुपये