Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तात्काळ भरा गाडीचा थर्ड पार्टी विमा…१ जूननंतर दंडात मोठी वाढ, कारावासाचीही शिक्षा!

May 30, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
cars

मुक्तपीठ टीम

पेट्रोल इंधन दरवाढीने लोक त्रस्त आहेत त्यात आणखी महागाई वाढत आहे. आता पुढील महिन्यापासून वाहन विमाही महाग होणार आहे. सरकार १ जून २०२२ पासून वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ करणार आहे. अशा परिस्थितीत, जर वाहन विमा संपणार असेल, तर तात्काळ भरा. कारण एक जूनपासून थर्ड पार्टी विमा न भरलेल्यांसाठी असलेल्या दंडात मोठी वाढ होणार आहे. तसेच काही प्रकरणात कारावासाचही शिक्षा होऊ शकते. यामुळे अपघातात वाहनाचे झालेले नुकसान तर भरून निघेल त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विमा नसताना किंवा मुदत संपल्यावर अपघात झाल्यास किंवा तुमच्या वाहनाचे इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर तुम्हाला त्याची आर्थिक भरपाई करावी लागेल. विमा रिन्यू न केल्यास, विमा कंपनी कोणत्याही नुकसानाचं क्लेम करणार नाही. तसेच, मोटार वाहन कायद्याच्या कलम-१४६ अन्वये, जर तुम्ही विमा नसलेले वाहन चालवत असल्याचे आढळून आले, तर २००० रुपये दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत कारावास या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. असा गुन्हा केल्यास ४ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावास या शिक्षा होऊ शकतात.

थर्ड पार्टी विमा समाविष्ट करणे आवश्यक

  • वाहन विमा रिन्यू करताना, त्यात थर्ड पार्टी विमा समाविष्ट करणे आवश्यक आहे.
  • मोटार वाहन कायदा, १९९८ च्या कलम १४६ अंतर्गत हे आवश्यक आहे.
  • या अंतर्गत, अपघात झाला तर क्लेम मिळत नाही, पण ज्याच्या वाहनाचे आपल्या गाडीमुळे नुकसान झाले आहे त्याला भरपाई मात्र मिळते. यामध्ये विरुद्ध पक्षालाच फायदा होतो.

नो क्लेम बोनस केव्हा मिळतो?

  • जर वाहन विम्याची मुदत संपल्यानंतर ९० दिवसांच्या आत रिन्यू केले नाही, तर विमा कंपनीकडून नो क्लेम बोनस मिळणार नाही.
  • नो क्लेम बोनस तुमचा विमा प्रीमियम ५०% पर्यंत कमी करण्यात मदत करते.
  • नो क्लेम बोनस अंतर्गत, पहिल्या वर्षासाठी २०% सूट उपलब्ध आहे.
  • ते वर्षानुवर्षे वाढत जाते आणि विमा रिन्यू करताना, प्रीमियमवर कमाल ५०% सवलत असते.

जर विमा एजंटकडून पॉलिसी घेतली असेल, तर रिन्यूच्या वेळी त्यांच्याशी संपर्क साधा.
जर पॉलिसी ऑनलाइन खरेदी केली असेल, तर विमा कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन योजना निवडा.
वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या योजनांची तुलना करा आणि प्रीमियम मिळवा. विमा कंपनीबद्दल समाधानी नसल्यास, तुम्ही ती बदलू शकता.

रिन्यूसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • एक्सपायर झालेल्या वाहन विम्याची प्रत
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • वाहनाची माहिती
  • आरटीओचा पत्ता, जिथे कार नोंदणीकृत आहे

Tags: muktpeethNo Claim BonusPrison EducationThird Party Insuranceकारावास शिक्षाथर्ड पार्टी विमानो क्लेम बोनसमुक्तपीठ
Previous Post

पालघर देहर्जे धरण, आदिवासींच्या शेतासाठी मरण!

Next Post

जाहिरात केली, पण एमएमआरडीएचे २४ कोटी लक्ष्य मीडियाने दिलेच नाहीत!

Next Post
MMRDA cheated by laqshya media limited

जाहिरात केली, पण एमएमआरडीएचे २४ कोटी लक्ष्य मीडियाने दिलेच नाहीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!