मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहे. यावेळी सरकारने १ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. तब्बल चार वर्षानंतर सरकारने काही छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. वित्त मंत्रालयाने २९ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ तिमाहीसाठी दोन लहान बचत योजनांच्या व्याजदरात २० बेस पॉइंट्स किंवा ०.२ टक्के वाढ करण्यात आली आहे.
‘कोणत्या’ बचत योजनेवर किती व्याजदर मिळणार?
- ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी २०१८ मध्ये शेवटची दरवाढ करण्यात आली होती.
- सरकारी बॉंड उत्पन्न वाढल्यामुळे नवीनतम व्याजदरात वाढ अपेक्षित होती.
- २०२०-२१मध्ये बॉंडच्या उत्पन्नात सातत्याने घट झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये सार्वजनिक गोंधळानंतर छोट्या बचत योजनांमध्ये ६०-७० बेस रेट कपात मागे घेण्यात आली होती. आता बाँडचे उत्पन्न झपाट्याने वाढले आहे, लहान बचत दर वरच्या दिशेने सुधारले गेले आहेत.
पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेत कोणताही बदल नाही
- मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर २० आधार अंकांनी म्हणजेच ०.२ ते ७.६ टक्के सरकारने वाढवला आहे.
- किसान विकास पत्राचा व्याजदर ७ टक्के करण्यात आला आहे.
- पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना यांसारख्या इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.
लहान बचत योजनांसाठी व्याजदर कसे ठरवले जातात?
- अल्पबचत योजनांवरील व्याजदरांचे सरकार दर तिमाहीत पुनरावलोकन करते.
- अल्पबचत योजनेच्या व्याजदरात येण्याचे सूत्र श्यामला गोपीनाथ समितीने दिले होते.
- समितीने असे सुचवले होते की विविध योजनांचे व्याजदर समान मुदतीच्या सरकारी बॉंडच्या उत्पन्नापेक्षा २५-१०० बीपीएस जास्त असावेत.