Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ… आनंदाची बातमी!

July 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
money

मुक्तपीठ टीम

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लवकरच त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुढील महिन्यात वाढणार आहे असे मिळालेल्या माहितीतून दिसत आहे. महागाई भत्त्याबाबत येणाऱ्या अपडेटनुसार, केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवेल अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा पगार आपोआप वाढेल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे महागाईचा आकडा. एआयसीपी निर्देशांक म्हणजेच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवला जातो. भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकात वाढ झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल.

महागाई भत्त्यात वाढीची घोषणा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता

  • केंद्र सरकार पुढील कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे.
  • आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक ऑगस्टमध्ये होणार आहे.
  • ऑगस्टमध्ये महागाई भत्त्याची घोषणा झाल्यास त्याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याची थकबाकीही येईल.

महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो. ऑगस्टमध्ये त्याची घोषणा होऊ शकते.
  • कर्मचाऱ्यांना आता ३८ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या त्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे.
  • ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात सरकार महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते.

सरकारने महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली

जर महागाई भत्ता वाढवला तर तो १ जुलै २०२२ पासून लागू होईल. कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्टची थकबाकीही मिळणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. 4 टक्के वाढीनंतर त्यांना ३८ टक्के महागाई भत्ता मिळेल. या आधारावर, जर १८ हजार रुपये पगार असलेल्यांना महागाई भत्त्यात ८ हजार ६४० रुपये वार्षिक लाभ मिळेल.


Tags: 7th Pay७वे वेतन वाढCentral Employees Allowancegood newsGovt EmployeesIncrease in Dearness Allowancemuktpeethआनंदाची बातमीकेंद्रीय कर्मचारी भत्ताघडलं-बिघडलंमहागाई भत्त्यात वाढमुक्तपीठसरकारी कर्मचारी
Previous Post

इंदूरहून जळगावकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात…

Next Post

आरपीआयनं एकनाथ शिंदेंचं लक्ष का वेधलं ग्वाल्हेरमधील भाजपाच्या पराभवाकडे?

Next Post
Sachin Kharat Eknath Shinde Jyotiraditya Schindia

आरपीआयनं एकनाथ शिंदेंचं लक्ष का वेधलं ग्वाल्हेरमधील भाजपाच्या पराभवाकडे?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!