मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील काही वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत भरीव वाढ करण्यात आली आहे. अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय या वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख इन्स्टिटयूटच्या नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता दुप्पट करण्यात आली आहे. अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंग, डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर आणि वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योग या संस्थांची प्रवेश क्षमता वाढवण्यात आली आहे. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला नव्या अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता आता २००
अहमदनगरच्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज अँड हॉस्पीटलच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून १५० वरुन २०० करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार 200 इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.
अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेजच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता आता १५०
धुळ्यातील साक्री रोड येथील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमेारियल मेडिकल कॉलेजच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून १०० वरुन १५० करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार १५० इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता १५०
अमरावतीच्या शिवाजीनगर येथील डॉ. पंजाबराव उपाख्य देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून १०० वरुन १५० करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार १५० इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.
भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता आता १००
नागपूरच्या नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालयाची प्रवेशक्षमता सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ६० वरुन १०० करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या आयुर्वेद महाविदयालयातील बी.ए.एम.एस. या नमूद आयुर्वेद या पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारीत केल्यानुसार १०० इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर संस्थेत विद्यार्थी प्रवेश देण्यात येतील.
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला एम.डी (Geriatrics) हा नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून २ विद्यार्थी प्रवेशक्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या महाविद्यालयातील नमूद वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार दोन इतकीच राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांची संलग्निता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील.
डॉ. पंजाबराव देशमुख इन्स्टिटयूटच्या नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता दुप्पट करण्यास परवानगी
अमरावतीच्या श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टि्यूटला बी.एस्सी. नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशक्षमता वाढ ५० वरुन १०० करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सन २०२१-२२ पासून या महाविद्यालयातील बी. एस्सी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता १०० इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, १९८७ मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंगला प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास परवानगी
बीडच्या चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंगला पदवी अभ्यासक्रमासाठी (बी.एस्सी. नर्सिंग) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रवेशक्षमता वाढ ३० वरुन ५० करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सन २०२१-२२ पासून या महाविद्यालयातील बी.एस्सी नर्सिंग या पदवी अभ्यासक्रमाची विद्याथी प्रवेशक्षमता ५० इतकी राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने नर्सिंग अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, १९८७ मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी
पुण्याच्या डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटरला कायाचिकित्सा, प्रसूतीतंत्र, स्त्रीरोग आणि कौमारभृत्य बालरोग या विषयातील आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कायाचिकित्सा या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता ६ वरुन १२, प्रसूतीतंत्र आणि स्त्रीरोग या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता ६ वरुन १२ आणि कौमारभृत्य बालरोग या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशक्षमता ४ वरुन १२ करण्यात आली आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून ही परवानगी देण्यात आली आहे.
या आयुर्वेद महाविद्यालयातील कायाचिकित्सा, प्रसूतीतंत्र,स्त्रीरोग आणि कौमारभृत्य बालरोग या विषयातील आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारित केल्यानुसार राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगला अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमता वाढ करण्यास परवानगी
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वंसतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगला आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून ही परवानगी देण्यात आली असून बी.ए.एम.एस. पदवी अभ्यासक्रमाची 40 वरुन 60 (EWS सह 50 वरुन 75) इतकी असणार आहे.
या आयुर्वेद महाविद्यालयातील बी.ए.एम.एस.पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही भारतीय चिकित्सा पध्दती राष्ट्रीय आयोग यांनी निर्धारीत केल्यानुसार राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील. महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला नविन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता
अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाला एम.डी. (Radio- diagnosis) हा नवीन वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 3 विद्यार्थी प्रवेशक्षमतेने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या महाविद्यालयातील नमूद वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची विद्यार्थी प्रवेशक्षमता ही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने निर्धारित केल्यानुसार दोन इतकीच राहील. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपध्दती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासनाने तसेच विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थी प्रवेश करण्यात येतील.