मुक्तपीठ टीम
कोरोना संकटात तापावरील प्रभावी औषध म्हणून Dolo-650 खूप लोकप्रिय औषधं ठरलं. त्याचं कारण बहुसंख्य डॉक्टर हीच गोळी लिहून देत असत. त्यामुळे ही गोळी बनवणारी बंगळुरुची मायक्रो लॅब्स लिमिटेड ही औषध कंपनीचा खजिना भरला. आता आयकर खात्याच्या कंपनीवरील धाडीत Dolo-650च्या लोकप्रियतेचे एक गुपित उघड झालं आहे. ही गोळी रुग्णांना सुचवण्यासाठी कंपनीने डॉक्टर आणि मेडिकल प्रोफेशनल्सना तब्बल एक हजार कोटींची भेट दिली आहे.
डॉक्टरांना एक हजार कोटींच्या भेटी!
- आयकर विभागाने मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या देशातील ३६ ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर धाडी घातल्या.
- या शोध मोहिमेदरम्यान महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
- ही औषध कंपनी ‘सेल्स अँड प्रमोशन’ या शीर्षकाखाली डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांना मोफत भेटवस्तू देत असे.
- त्याचा उल्लेख त्यांच्या लेखा पुस्तकांमध्ये बेहिशेबी खर्च डेबिट करत आहे.
- डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या फायद्यांमध्ये ‘प्रमोशन आणि प्रोपगंडा’, “सेमिनार आणि सिम्पोजियम” आणि “वैद्यकीय सल्ला” इत्यादी शब्दांमध्ये खर्च दाखवत असत.
- प्रत्यक्षात कंपनीच्या डोलोसारख्या औषधांचा प्रचार करण्यासाठी प्रवास खर्च आणि भेटवस्तू दिल्या जात असत.
- या कंपनीने आपली उत्पादने/ब्रँडचा प्रचार करण्यासाठी अनैतिक पद्धतींचे धोरण स्वीकारल्याचे पुराव्याहून उघड होत आहे.
- अशा मोफत भेटींवर सुमारे १००० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे.
छाप्यात रोख रक्कम आणि दागिने जप्त करण्यात आले
- आयकर खात्याच्या निवेदनानुसार, औषध निर्मात्यावर कारवाई केल्यानंतर विभागाने एक कोटी २० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
- तसेच १ कोटी ४० लाख रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत.
- शोध मोहिमेदरम्यान आयकर पथकाला कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण पुरावे सापडले आहेत.
ब्रँडचा प्रचार करण्यासाठी अनैतिक मार्ग!
- आयकर खात्याच्या माहितीनुसार, पुराव्यावरून असे सूचित होते की गटाने आपली उत्पादने/ब्रँड्सचा प्रचार करण्यासाठी अनैतिक पद्धतींचा वापर केला आहे.
- त्यासाठी वाटण्यात आलेली रक्कम ही हजार कोटींच्यावर आहे.
- आयकर खात्याने अद्याप त्यांच्या निवेदनात कंपनीच्या नावाचा उल्लेख केला नसला, तरीही ती कंपनी मायक्रो लॅब असल्याचे नक्की आहे.