मुक्तपीठ टीम
कचरा म्हटले की दुर्गंध ठरलेलाच. त्यातही कचरापेटी किंवा उकिरडा असला की नाकावर हात जातोच जातो. पण मुंबईतील वडाळ्यातील एक कचरापेटी अशी आहे जी मनातील या साऱ्या कल्पना चुकीच्या ठरवते. कारण ती कचरापेटी आहे…चक्क सुगंधित!
कचरापेटीला सुगंधित करण्याचा चमत्कार घडलाय तो वडाळ्याच्या सहकार नगरमध्ये. तेथे मुंबई मनपाने ही सुगंधी आणि सुशोभित कचरापेटी तयार केली आहे. नगरसेवक अमेय घोले यांच्या नगरसेवक निधीतून ही आकर्षक कचरापेटी बनविण्यात आली आहे. या उपक्रमात उपायुक्त विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे इत्यादींनी सहकार्य केले असल्याचे अमेय घोलो यांनी सांगितले.
सुगंधी कचरापेटीचा उपक्रम मुंबईत पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे. तसेच या उपक्रमाला रहिवाशांकडून दाद मिळत आहे. ही कचरापेटी सर्व नागरिकांसाठी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
सहकार नगर ही वडाळ्यातील ४६ इमारतींची मोठी वसाहत आहे.
ज्यावेळेस कचरा विलगीकरणाचे निर्देश प्रशासनाने जारी केले होते त्यावेळी, कचरा पेटीच्या जागी कचरा वर्गीकरण केंद्रे सुरू केले होते. त्याचेच पुढे सुगंधा कचरापेटीत रुपांतर झाले. या उपक्रमामध्ये येथील परिसरात अनेक भिंतींवर व्हर्टिकल गार्डन विकसित करून त्यावर सहकार नगरचा डिजिटल फलक लावला आहे. या गार्डनमध्ये सुगंधित फुलांची रोपटी लावण्यात आली आहेत. ज्यामुळे सुगंध दरवळत राहील आणि कचरापेटीची जाणीवही होणार नाही.
या उपक्रमाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भरभरून कौतुक केले आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यासह अनेक जणांनी या उपक्रमाला भेट देऊन याची पाहणी केली आहे.
पाहा व्हिडीओ: